शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पराभव झाला की घडवून आणला गेला?; पंकजा मुंडे म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 19:30 IST

पक्षाच्या आणि स्वत:च्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर सूचक भाष्य

बीड: भाजपा नेत्या पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांचा पराभव घडवून आणण्यात आला, असा स्पष्ट आरोप एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. आपण आरोपांचे पुरावे देऊ असं म्हणत त्यांनी थेट माजी मंत्री गिरीश महाजन यांनादेखील आव्हान दिलं होतं. या संपूर्ण आरोप प्रत्यारोपांवर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी अतिशय सूचक विधानं करत पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्त्वावर टीका केली. विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात माझा पराभव झाला. मात्र हा पराभव मी केवळ पाच मिनिटांमध्ये स्वीकारला. मी दिग्गज नेत्यांना पाहात लहानाची मोठी झाले आहे. त्यामुळे मी लगेच पराभव पचवू शकले, असं पंकजा म्हणाल्या. तुमचा पराभव झाला की घडवून आणला गेला, या प्रश्नाला त्यांनी अतिशय सावधपणे उत्तर दिलं. माझा पराभव घडवून आणला, असं कसं म्हणता येईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या काळात मी पक्षासाठी अतिशय समर्पित भावनेनं काम केलं. शेवटपर्यंत मी इतर मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा घेत होते, असंदेखील त्यांनी सांगितलं. यशामध्ये भागीदार होता, तर पराभवाचीदेखील जबाबदारी घ्यायला हवी. आमचं चुकलं हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला हवा, अशा सूचक शब्दांमध्ये पंकजा मुंडेंनी पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीवर भाष्य केलं. पंकजा उद्या गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन समर्थकांना संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपापासून काहीशा दूर गेलेल्या पंकजा मुंडे उद्या नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. गोपीनाथ गडावरील मेळाव्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगत पक्षाच्या राज्यातील नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'गोपीनाथ मुंडेंना एखाद्याला जवळ करायचं असेल, तर त्यामुळे दूर जाऊ शकणाऱ्या व्यक्तीला ते आधी जवळ करायचे. अशाच प्रकारे त्यांनी माणसं जपली,' असं मुंडे म्हणाल्या.भाजपा सोडणार याबद्दलच्या वावड्या कुठून उठवण्यात आल्या, याबद्दल मला कल्पना नाही. नाराज हा शब्दच मला आवडत नाही. मी कोणावर नाराज होऊ, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षाकडून पद मिळवण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्या जात असल्याच्या दाव्यांचा त्यांनी पूर्णपणे इन्कार केला. मी ज्यांच्याकडे काही मागावं, अशी कोणतीही मोठी व्यक्ती माझ्या आजूबाजूला नाही. सध्या जे कोणी आजूबाजूला आहेत, त्यांच्यासोबत मी बरोबरीनं काम केलं आहे, असंदेखील त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाEknath Khadaseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनGopinath Mundeगोपीनाथ मुंडे