पोलीस कोठडीतून घरफोड्याचे पलायन

By Admin | Updated: January 7, 2015 00:17 IST2015-01-07T00:17:23+5:302015-01-07T00:17:23+5:30

शिरपूर तालुक्यातील घटना.

House burglary escape from police custody | पोलीस कोठडीतून घरफोड्याचे पलायन

पोलीस कोठडीतून घरफोड्याचे पलायन

शिरपूर जैन (जि. वाशिम) : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन विरोधी ऊर्फ विजय फुटबॉल पवार या अट्टल घरफोड्याने मंगळवारी शिरपूर जैन पोलीस ठाण्यातून पलायन केले. न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी विजय पवार याला शिरपूर पोलिसांनी ५ जानेवारी रोजी घरफोडीच्या एका गुनत ताब्यात घेतले होते. त्याने शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या चोरीच्या दहा गुनंची कबुली दिली होती, हे विशेष. त्याला पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्याने रात्रीच पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. आरोपी पसार झाल्याची बाब दिवस उजाडल्यानंतरच पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याच्या शोधात पोलिसांची पथके डोणगाव, मेहकर, रिसोडकडे रवाना झाली.

Web Title: House burglary escape from police custody