शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १० जिल्ह्यांत सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस; आता परतीच्या पावसावरच आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 06:34 IST

मॉन्सूनच्या मुख्य चार महिन्यांपैकी साडेतीन महिने सरत असले असून राज्यातील अनेक भागात शेतीला आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही.

पुणे : मॉन्सूनच्या मुख्य चार महिन्यांपैकी साडेतीन महिने सरत असले असून राज्यातील अनेक भागात शेतीला आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही. १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १८ सप्टेंबरपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्याचदरम्यान मॉन्सूनच्या परतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसावरच प्रामुख्याने आशा केंद्रीत झाल्या आहेत.गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या तीनही विभागात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. याशिवाय अहमदनगर (-१३), धुळे व जळगाव (-१७), परभणी (-१५), यवतमाळ (-१३) टक्के पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २८ टक्के जादा पाऊस झाला असून ठाणे ११ टक्के, नांदेड ९ टक्के जादा पावसाची नोंद झाली आहे.ईशान्य भारतातील काही राज्यांचा अपवाद वगळता सध्या संपूर्ण भारतात मॉन्सून थबकलेला आहे. अरबी समुद्र तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार न झाल्याने देशभरात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. महाराष्ट्रासारखीच अनेक राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. रायलसीमा भागात सरासरापेक्षा तब्बल ४६ टक्के पाऊस कमी झाला आहे.कमी पावसाचे जिल्हेसोलापूर (- ३१), सांगली (-३०), नंदूरबार (- २९), औरंगाबाद (-२५), बुलढाणा व वर्धा (- २४), लातूर (-२३), अमरावती व बीड (- २२), जालना (-२१).पुढील चार दिवस मॉन्सूनची स्थिती अशीच राहण्याची शक्यता असून १८ सप्टेंबर दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे मध्य भारतात काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असून त्याचा फायदा राज्यातील काही जिल्ह्यांना होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र