शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळांवरील नियुक्त्यांची आशा पुन्हा एकदा पल्लवित; भाजपाकडून नावांच्या याद्या सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 05:59 IST

शिंदेसेना, अजित पवार गटाकडूनही नावे मागविली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या मध्यात लागू होण्याची शक्यता असताना आता महायुती सरकार महामंडळांवरील नियुक्त्यांच्या मागे लागले आहे. त्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते, नेत्यांचे समाधान करत त्यांना प्रचारात सक्रिय केले जाणार आहे. 

जून २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आले. तेव्हापासून महामंडळे, महत्त्वाच्या विविध समित्यांवरील नियुक्ती झालेल्या नाहीत. मध्यंतरी भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट अशा तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचा आणि प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली. आ. प्रसाद लाड हे या समितीचे समन्वयक आहेत. सूत्रांनी सांगितले की, महामंडळांवरील नियुक्तीसाठी भाजपचे नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. 

तिन्ही पक्ष एकत्रित बसून घेतील अंतिम निर्णय

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार  आ. प्रसाद लाड यांनी भाजपचे प्रमुख नेते, मंत्री, विभागीय संघटकांशी चर्चा करून काही नावे काढली आहेत.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि एक-दोन ज्येष्ठ मंत्र्यांची लवकरच बैठक होऊन त्यात नावांना अंतिम स्वरूप दिले जाईल.

त्याचप्रमाणे शिंदे सेना आणि अजित पवार गटाकडूनही काही नावे ठरविली जात असल्याची माहिती आहे. तिन्ही पक्षांच्या याद्या तयार  झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रितपणे बसून अंतिम निर्णय घेतील. १७ ऑगस्टपर्यंत निर्णय होईल, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. 

समन्वय समितीच्या पातळीवर महामंडळांवरील नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्याचे बरेचदा ठरले पण याद्याच तयार झाल्या नव्हत्या. आता या कामाला गती देण्यात आली आहे. 

पद जाईल की पूर्ण कार्यकाळ मिळेल

- महायुतीतील ज्या नेत्यांना महामंडळांवर नियुक्ती मिळेल पण लगेच आचारसंहिता लागणार आहे.- विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलले तर या नियुक्ती औटघटकेच्या ठरतील, असा एक सूर आहे पण जाणकारांच्या मते महायुतीचे सरकार आले नाही तरी महामंडळांवर आता नियुक्त केलेले पदाधिकारी कायम राहतील.- कारण, महामंडळांच्या कायद्यात जेवढा कार्यकाळ नमूद केलेला असतो तेवढ्या कार्यकाळासाठी संबंधितास पदावर राहता येते. - सरकार बदलले तरी आधीच्या सरकारद्वारे नियुक्त नेत्यांना महामंडळांवरून काढता आले नाही, अशी उदाहरणे आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस