हुडहुडी : राज्यातील तापमानाचा पारा आणखी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:07 AM2018-01-26T03:07:56+5:302018-01-26T03:08:08+5:30

जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असून तिकडून येणाºया थंड वा-यामुळे राज्यातील गारठा कमालीचा वाढला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत झपाट्याने उतरलेला तापमानाचा पारा गुरुवारी आणखी खाली गेला.

 Hoodhudi: The temperature of the state has dropped further | हुडहुडी : राज्यातील तापमानाचा पारा आणखी घसरला

हुडहुडी : राज्यातील तापमानाचा पारा आणखी घसरला

Next

पुणे : जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असून तिकडून येणाºया थंड वा-यामुळे राज्यातील गारठा कमालीचा वाढला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत झपाट्याने उतरलेला तापमानाचा पारा गुरुवारी आणखी खाली गेला. गोदाकाठी निफाडला ४.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे़ विदर्भातील अनेक शहरांमधील किमान तापमानात एकाच दिवसात ३ ते ४ अंश सेल्सिअसने घट झाली, तर मराठवाड्यात २ ते ५ अंश सेल्सिअसने पारा उतरला आहे़ पुणे शहरातील किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांच्या खाली घसरला़
मुंबईतही किमान तापमान १५.१ अंश सेल्सिअस एवढे खाली आले आहे.

Web Title:  Hoodhudi: The temperature of the state has dropped further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.