‘ती’च्या गणपतीला मानाचे पान

By Admin | Updated: September 5, 2016 01:15 IST2016-09-05T01:15:21+5:302016-09-05T01:15:21+5:30

‘लोकमत’ने नेहमीच विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड दिली आहे.

The honorable page of Ganesha of 'Ti' | ‘ती’च्या गणपतीला मानाचे पान

‘ती’च्या गणपतीला मानाचे पान


पुणे : ‘लोकमत’ने नेहमीच विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड दिली आहे. महिलाशक्तीला सन्मान देण्यासाठी ‘ती’चा गणपती या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. महिला शक्तीचे दर्शन घडविणाऱ्या या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे़
‘लोकमत’ने पुरोगामित्वाच्या भूमिकेला बळ देतानाच सामाजिक, सांस्कृतिक भान ठेवले आहे. समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याच्या भूमिकेतून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; मात्र महिलांच्या रूपाने अर्धे जग त्यापासून वंचित होते. भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीला आदिशक्ती म्हटले जात असले, तरी पुरुषप्रधान संस्कृतीने गणेशोत्सवासारख्या उपक्रमांवर आपले वर्चस्व ठेवले होते.
‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव आणखी समाजाभिमुख होऊन लोकमान्यांच्या परंपरेतील पुढचे पाऊल पडले. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करतानाच महिलांच्या विचाराला व्यासपीठ देणारी ‘ती’चा गणपती हीदेखील एक चळवळ बनली़ पुण्याच्या सर्व क्षेत्रातील महिला गेली दोन वर्षे ‘ती’चा गणपतीला आवर्जून भेट देत आहेत़
कृती, निर्मिती आणि संस्कृतीच्या माध्यमातून उत्सव सर्जनशील आणि कृतिशील व्हावा, यासाठी ‘लोकमत’तर्फे आपले बाप्पा संकल्पनेच्या आधारावर गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात सर्वच ठिकाणी सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशाची आराधना केली जाते, यामध्ये पुरुषांचाच मोठ्या प्रमाणात समावेश असतो; मात्र ‘लोकमत’ने या परंपरेत भर टाकत महिलांचे मंडळ स्थापन केले असून, मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
शिक्षण आणि संस्कृतीचा ऐतिहासिक परंपरेचा वसा पुढे नेत पुणे शहरात ‘ती’चा गणपती हा उपक्रम साजरा केला जात आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. हर्षिता सुदान या लोकमत ‘ती’चा गणपती मंडळाच्या अध्यक्षा असून, अमृता हर्षे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. महिलांनी महिलांसाठी चालविलेले मंडळ, अशी या उपक्रमाची विशेष ओळख असून, शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांनीही महिलांना आरतीचा मान द्यावा, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. अशा मंडळांच्या कार्याची दखल घेण्यात येणार
असून, मंडळांनी महिलांच्या हस्ते केलेल्या आरतीचे फोटो
ंंस्र’ीुंस्रस्रं16@ॅें्र’.ूङ्मे या मेल आयडीवर पाठवावेत.
या उपक्रमाचे सहप्रायोजक रंगवर्षा सारिज, आयवोना स्पा, ब्यूटी पार्टनर आयएसएएस, हेल्थ पार्टनर बिक्रम योगा, फिटनेस पार्टनर फिटनेस मंत्राज् जिम, मार्केटयार्ड, नॉलेज पार्टनर अ‍ॅपटेक कॉम्प्युटर एज्युकेशन बॅँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स अ‍ॅकॅडमी, डेक्कन पुणे आहेत.
>४‘सेल्फी विथ बाप्पा’ हा अनोखा उपक्रम गणेशोत्सव कालावधीत ‘लोकमत’तर्फे राबविण्यात येत आहे. यामध्ये आपल्या घरातील गणपतीबरोबर काढलेला सेल्फी नागरिकांनी ‘लोकमत’च्या
९०११०२९१८१ क्रमांकावर पाठवायचा आहे. ‘लोकमत’कडे आलेल्या छायाचित्रांतील निवडक छायाचित्रांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
>स्पर्धांत बक्षिसे जिंकण्याची संधी
गौरी-गणेश आरास स्पर्धा, इको-फ्रेंडली आरास स्पर्धा; तसेच मोदक स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे. यामध्ये जिंकून येणाऱ्यांना ‘लोकमत’तर्फे आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

Web Title: The honorable page of Ganesha of 'Ti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.