शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

Nirbhaya case : निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवल्याने कायद्याचा सन्मान : खासदार सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 13:00 IST

निर्भयासारख्या भयंकर घटना आपल्या देशातच नव्हे तर जगातही होता कामा नये

ठळक मुद्देखासदार सुप्रिया सुळे यांनी निर्भयाला वाहिली श्रद्धांजली दिशा कायदा राबविण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई : निर्भयाचे गुन्हेगारांना शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजता फासावर लटकवण्यात आले. त्यामुळे कायद्याचा सन्मान राखला गेला अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावना व्यक्त केल्या. सात वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर अखेर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे. निर्भयाच्या परिवाराला  कठोर संघर्षातून जावे लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. निर्भयासारख्या भयंकर घटना आपल्या देशातच नव्हे तर जगातही होता कामा नये,असेही त्या म्हणाल्या.   निर्भया प्रकरणातील चारही दोषी आरोपींना शुक्रवारी पहाटे (दि. २०)फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या आई वडिलांसह अनेकांनी सोशल मीडियावरुन श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील एक व्हिडिओ व ट्विटरच्या माध्यमातून निर्भयाला श्रध्दांजली वाहिली. त्या व्हिडिओत सुळे म्हणाल्या, निर्भयाच्या आई ज्या प्रसंगातून, दु:खातून गेली असेल त्याबद्दल मी नि:शब्द आहे. पण आता पुन्हा दुसरी निर्भया होऊ नये याची खबरदारी आपण सर्वजण नक्की घेऊ शकतो. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,हा संदेश या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीतून दिला गेला.बलात्कार ही मोठी आणि भयानक गोष्ट असून छेडछाडमुक्त देश व जग असावे. मुलगी असो वा मुलगा त्याला किंवा तिला कोणत्याही वेळी कुठेही जाण्याची मोकळीक मिळालीच पाहिजे असे त्यांनी नमूद केल्या. त्या म्हणाल्या, की सत्तेत कुणीही असो नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचा न्याय ही सरकारची जबाबदारी आहे.निर्भया प्रकरण असो की हिंगणघाटची घटना किंवा महाराष्ट्रात गेल्या चार पाच वर्षांत घडलेल्या वेगवेगळ्या घटना असतील त्या अतिशय दुर्देवी आहेत. अशा घटनांचा निवाडा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट असावेत व आम्ही त्याबाबत प्रयत्नशील आहोत. 

दिशा कायद्यासाठी प्रयत्नशीलमहाराष्ट्रात दिशा कायदा राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'दिशा' कायद्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते आंध्र व तेलंगणास जाऊन त्याबाबतची सखोल माहिती घेऊन आले आहेत.

निर्भयाच्या आई ज्या प्रसंगातून, दु:खातून गेली असेल त्याबद्दल मी नि:शब्द आहे. पण आता पुन्हा दुसरी निर्भया होऊ नये याची खबरदारी आपण सर्वजण नक्की घेऊ शकतो.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयRapeबलात्कारNCPराष्ट्रवादी काँग्रेस