शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीरमच्या पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'नं सन्मानित करा, मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 18:20 IST

Serum Institute : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरही सीरम इन्स्टिट्यूट तर्फे विकसित करण्यात येत आहे लस.

ठळक मुद्दे१९६६ मध्ये सायरस पुनावाला यांनी सीरम इन्स्टिट्यूटची केली होती स्थापनासीरममध्ये सध्या पोलिओ, डायरिया, हेपिटायटिस, स्वाईन फ्लू सारख्या लसीही विकसिक करण्यात येत आहेत

सध्या भारतात कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस विकसित करण्यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. अशातच सायरस पुनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ही संस्थादेखील कोरोनावरील लस विकसित करण्याचं काम करत आहे. याव्यतिरिक्त आजवर सीरम इन्स्टिट्यूटनं अनेक रोगांवरील लसीही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या अनेक वर्षांचं योगदान पाहता  सायरस पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती केली आहे. "सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महासाथीतही पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे," असं नांदगावकर म्हणाले. असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी विनंतीही त्यांनी केली आहे.  १९६६ मध्ये सायरस पुनावाला यांनी सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. आज अनेक आजारांवरील लस विकसित करण्यात सीरमचा मोठा वाटा आहे. सीरममध्ये सध्या पोलिओ, डायरिया, हेपिटायटिस, स्वाईन फ्लू सारख्या लसीही विकसिक करण्यात येत आहेत. तसंच सध्या कोरोनावरीलही लस विकसित करण्याचं काम सीरममध्ये सुरू असून अत्यंत माफक दरात ही लस सरकारलाही देण्यात येणार असल्याचं यापूर्वी अदर पुनावाला यांनी सांगितलं होतं. 

 

टॅग्स :MNSमनसेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस