शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार दिलीप मोहितेंवरील हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 16:10 IST

honeytrap CrimeNews Satara : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेले हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आले. विशेष म्हणजे एका युवतीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला असून या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोघांचा तर साताऱ्यातील एकाचा समावेश आहे.

ठळक मुद्देआमदार दिलीप मोहितेंवरील हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस तिघांवार गुन्हा; युवतीनेच केला भांडाफोड

सातारा: पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेले हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आले. विशेष म्हणजे एका युवतीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला असून या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोघांचा तर साताऱ्यातील एकाचा समावेश आहे.शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयुर साहेबराव मोहिते-पाटील (वय ३५, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, या संशयितांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून बदनामीच्या भितीने त्यांच्याकडून लाखो रूपयांची माया गोळा करण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात त्या युवतीला काही रक्कम संशयितांनी दिली होती. मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भांडाफोड करून हे प्रकरण उघडकीस आणले.

दि. २२ एप्रिल रोजी साताऱ्यातील त्या युवतीने मयुर यांना फोन करून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने सातारा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला. त्या युवतीने चौकशीत दिलेली माहिती अशी की, साताऱ्यात राहणारा सोमनाथ शेडगे हा तिचा मित्र असून त्याच्या ओळखीने शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे दि.१२ एप्रिल रोजी साताऱ्यात संबंधित युवतीला भेटण्यासाठी आले.

त्यांनी तिला आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. त्याबद्‌ल्यात संशयितांनी त्या युवतीला काही रोख रक्कम व पुण्यात एक फ्लॅट देण्याचे कबुल केले. त्यासाठी तुला त्यांच्याकडे नोकरीच्या बहाण्याने जायचे असून त्यानंतर त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांची बदनामी करावी लागेल, असा प्लॅन संशयितांनी युवतीला सांगितला. त्याबदल्यात तीला वेळोवेळी एकूण ९० हजार रूपये देण्यात आले.

मात्र, हा सगळा प्रकार मनाला न पटल्याने त्या युवतीने आमदारांचे पुतणे व तक्रारदार मयुर यांना फोन करून सांगितले, त्यानंतर एकच खळबळ उडाली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तत्काळ संबंधित युवतीकडे कसून चौकशी करून यातील काही महत्त्वाचे पुरावे हाती घेतले. त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला.याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नव्हती. युवतीच्या मित्राचाही पैशांमध्ये वाटा!युवतीचा मित्र सोमनाथ शेडगे याला संशयित आरोपी पैसे देत होते. यातील काही पैसे सोमनाथ शेडगे हा स्वतःजवळ ठेवायचा. त्यानंतर उरलेली रक्कम तो संबंधित युवतीकडे देत होता, असे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस