प्रामाणिकपणे कमविलेला पैसा बँकेत टाकता येईल - मुख्यमंत्री
By Admin | Updated: November 9, 2016 15:29 IST2016-11-09T15:29:33+5:302016-11-09T15:29:33+5:30
प्रामाणिकपणे कमावलेला पैसा बँकेत जमा करता येईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रामाणिकपणे कमविलेला पैसा बँकेत टाकता येईल - मुख्यमंत्री
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 9 - 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर तडकाफडकी बंदी घालण्यात आली असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र प्रामाणिकपणे कमावलेला पैसा बँकेत जमा करता येईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
औरंगाबाद येथे डीएम्आयसीच्या मध्यवर्ती इमारतीचे भूमीपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री आज आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. "प्रामाणिकपणे कमविलेला पैसा एकत्रितपणे बँकेत टाकता येईल." दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून या निर्णयाचे स्वागत केले होते.