घरगुती भांडणातून सासू-सुनेची आत्महत्या

By Admin | Updated: October 4, 2016 01:33 IST2016-10-04T01:33:18+5:302016-10-04T01:33:18+5:30

थील घरगुती कारणामुळे सासू-सून यांच्यात झालेल्या भांडणातून सासूने रानात विषप्राशन करून आत्महत्या केली

Homicide Suicide Suicide | घरगुती भांडणातून सासू-सुनेची आत्महत्या

घरगुती भांडणातून सासू-सुनेची आत्महत्या

वालचंदनगर : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील घरगुती कारणामुळे सासू-सून यांच्यात झालेल्या भांडणातून सासूने रानात विषप्राशन करून आत्महत्या केली, तर सासूने आत्महत्या केल्याने सुनेनेही राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लासुर्णे येथे घडली. ही घटना शनिवारी दुपारी परिसरातील महिला शेतात खुरपणीसाठी गेल्या असताना उघडकीस आली.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सासू सिंधू बाळासाहेब कोळेकर (वय ४८) व सून कल्पना मंगेश कोळेकर (वय २३) यांच्यामध्ये शुक्रवारी (३० सप्टेंबर) घरगुती कारणावरून भांडणे झाली होती. याच्या रागातून सासू सिंधूबाई घरातील देवाच्या मूर्ती पिशवीत घेऊन न सांगताच निघून गेल्या. त्यांचा कुटुंबीयांनी शोध घेतला. शोधाशोध करूनदेखील त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे कर्नाटकातील देवीला दर वर्षी जात असल्याने यंदादेखील त्या देवीला गेल्याचा कुटुंबीयांचा समज झाला. (वार्ताहर)

Web Title: Homicide Suicide Suicide