होमी भाभांचा बंगला लिलावात

By Admin | Updated: June 19, 2014 02:59 IST2014-06-19T02:59:13+5:302014-06-19T02:59:13+5:30

भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचा मलबार हिल येथील ‘मेहरांगीर’ हा बंगला बुधवारी तब्बल ३७२ कोटी रुपयांना विकला गेला.

Homi Bhabha's Bungalow Auction | होमी भाभांचा बंगला लिलावात

होमी भाभांचा बंगला लिलावात

मुंबई : भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचा मलबार हिल येथील ‘मेहरांगीर’ हा बंगला बुधवारी तब्बल ३७२ कोटी रुपयांना विकला गेला. एनसीपीएच्या वतीने (नॅशनल सेंटर परफॉर्मिंग आर्ट्स) घेतलेल्या लिलावादरम्यान विक्रमी बोली लावून हा बंगला विकत घेणाऱ्याने ओळख जाहीर करू नये, अशी विनंती केल्याने संबंधिताचे नाव घोषित करण्यात आलेले नाही.
दक्षिण मुंबईतील हँगिंग गार्डनलगत १५ हजार चौरस फूट आणि १ हजार ५९३ चौरस मीटर क्षेत्रफळावर तीन मजली ‘मेहरांगीर’ बंगला आहे. १९६६ साली डॉ. भाभा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर ‘मेहरांगीर’चा ताबा कला आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित असणारे त्यांचे बंधू जमशेद यांच्याकडे आला होता. मात्र २००७ साली जमशेद यांचाही मृत्यू झाल्यानंतर हा बंगला एनसीपीएकडे हस्तांतरित झाला.
२०१० सालीच हा बंगला लिलावात काढण्यासाठीचे प्रयत्न झाले होते. मात्र हे प्रकरण थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात पोहोचल्याने ते तेथेच थंडावले. मात्र पुन्हा या बंगल्याच्या लिलावाची चर्चा सुरू झाली. परंतु या बंगल्याच्या लिलावाला स्थगिती देण्यासाठी भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरच्या कर्मचारीवर्गाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाने बंगल्याच्या लिलावाच्या स्थगितीच्या मागणीस नकार दर्शविला. शिवाय याबाबतची सुनावणी २३ जून रोजी ढकलत अगदी गरजेचे झाले तर लिलाव रद्द करण्यात येईल, असे म्हटले. त्यानंतर एनसीपीएने बुधवारी हा बंगला लिलावात काढला. (प्रतिनिधी)

Web Title: Homi Bhabha's Bungalow Auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.