शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

होम ट्रेड ही केदारांचीच कंपनी?

By admin | Updated: June 1, 2017 03:16 IST

ज्या होम ट्रेड सेक्युरिटीजने जिल्हा बँकेला १४८ कोटींचा चुना लावला. त्या कंपनीचे सुनील केदार भागीदार होते का? असा प्रश्न

सोपान पांढरीपांडे / लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या होम ट्रेड सेक्युरिटीजने जिल्हा बँकेला १४८ कोटींचा चुना लावला. त्या कंपनीचे सुनील केदार भागीदार होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘लोकमत’जवळ असलेल्या कागदपत्रांनुसार जिल्हा बँकेने सर्क्युलर ठरावाद्वारे युरो डिस्कव्हर इंडिया लि. या कंपनीला ४० कोटींचे कर्ज १४ सप्टेंबर २००० रोजी दिले. या ठरावाला २६ पैकी ७ संचालकांची मंजुरी होती.या कर्जासाठी घातलेल्या अटीही गमतीदार होत्या. युरो डिस्कव्हर कर्जापोटी होम ट्रेडचे पाच लाख शेअर्स बँकेकडे गहाण ठेवेल. (शेअर नाममात्र भाव प्रत्येकी ८०० रुपये), या कर्जावर द.सा. द.शे. २० टक्के व्याज राहील, होम ट्रेडचे संचालक संजय अग्रवाल, केतन सेठ व एन. एस. त्रिवेदी हे या कर्जाची प्रत्येकी १६ कोटीची हमी घेतील आणि कर्ज थकल्यास युरो डिस्कव्हर कंपनी होम ट्रेडचे शेअर ९६० प्रतिशेअर या भावाने खरेदी करेल.मजेची बाब म्हणजे, युरो डिस्कव्हरला कर्ज दिल्यावर पाच महिन्यानंतर जिल्हा बँकेने होम ट्रेडमार्फत ५ फेब्रुवारी २००१पासून रोखे व्यवहार सुरू केले. त्याच्यावर कडी म्हणजे, युरो डिस्कव्हरने हे कर्ज सहाच महिन्यांत म्हणजे, १९ मार्च २००१ रोजी फेडले. मुद्दलापोटी ४० कोटी व सहा महिन्यांच्या व्याजापोटी ४ कोटी, असे ४४ कोटी बँकेला त्या दिवशी परत मिळाले.यातून असा स्पष्ट अर्थ निघतो की, युरो डिस्कव्हरने बँकेकडून रोखे व्यवहारासाठी मिळालेल्या रकमेतून कर्जफेड केली. होम ट्रेडशी केदारांचे अतिनिकटचे संबंध असल्याशिवाय हे शक्य झालेले नाही. होम ट्रेडचे संचालक संजय अग्रवाल, केतन सेठ व एन. एस. त्रिवेदी यांना आपण ओळखतो, असे शपथपत्र केदारांच्या चार्टर्ड अकाउंटंटने केले होते. हे चार्टर्ड अकाउंटंट सध्या हयात नाहीत; पण हे नोटरीकडे नोंदलेले शपथपत्र ‘लोकमत’जवळ आहे. होम ट्रेडमध्ये केदारांची भागीदारी असल्यामुळेच केदारांच्या सीएने खोटे शपथपत्र केले व बँकेने युरो डिस्कव्हरला कर्ज दिले, असा निष्कर्ष यावरून निघतो. रोखे घोट्याळ्याची चौकशी स्पेशल आॅडिटर यशवंत बागडे यांनी केली होती. त्यांनी या प्रकरणात अध्यक्ष सुनील केदार, उपाध्यक्ष सौ. आशाताई महाजन, श्यामराव धवड, सौ. कुसुमताई किंमतकर, मोरबाजी निमजे, रमेश निमजे, संतोष चौरे व महाव्यवस्थापक चौधरी यांना दोषी ठरवून प्रत्येकी १००० दंड ठोठावला होता. जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र नागपूर जिल्ह्यापुरते मर्यादित असताना मुंबईच्या कंपनीला बेकायदेशीर कर्ज दिल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवला होता.हर्षवर्धन पाटील यांचा निर्णय संशयास्पदचौकशी अधिकारी यशवंत बागडे यांनी २८ नोव्हेंबर २०१३ रोजी अहवाल दिला. त्याला केदारांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापुढे आव्हान दिले. पाटील यांनी १४ जून २०१४ रोजी बागडेंची चौकशी रद्द करून नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले.वास्तविक, या प्रकरणातील आठ दोषी संचालकांपैकी केदार, चौधरी व रमेश निमजे हे तीन संचालक वगळता बाकीच्या पाच संचालकांनी दंडाची रक्कम भरणा केली आहे. एक चौकशी अहवाल पाच संचालकांना मान्य असताना तो केदार, चौधरी व निमजे या तिघांवरच अन्याय करणारा कसा होऊ शकतो, असा उपस्थित झाला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी दिलेली स्थगिती संशयास्पद असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(उद्या वाचा : खटला प्रलंबित ठेवण्यासाठी केदारांनी काय उचापती केल्या.)