शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

अनाथांना मिळणार हक्काचे घर : म्हाडामध्ये १ टक्का समांतर आरक्षणास मान्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:26 IST

राज्यभरात १८ वर्षांवरील सुमारे ४ हजारहून अधिक मुले-मुली आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

ठळक मुद्देम्हाडाच्या गृहनिर्माण योजनेत अनाथांना घरे मिळावीत यासाठी जानेवारी २०१९ मध्ये ठराव मंजूर ‘लोकमत’ने प्रथम या प्रश्नाला फोडली होती वाचा

- श्रीकिशन काळे पुणे : म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेमध्ये अनाथांना आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्षांपासूनची लढाई सुरू होती. त्याला आता यश आले असून,सरकारने अनाथ व्यक्तींना खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण देण्यास मान्यता दिली आहे. राज्यभरात १८ वर्षांवरील सुमारे ४ हजारहून अधिक मुले-मुली आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. ‘लोकमत’ने प्रथम या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा केला होता. म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेत अनाथांना घरे मिळावीत, यासाठी जानेवारी २०१९ मध्ये ठराव मंजूर केला होता. त्यानंतर सरकारकडे तो मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या आरक्षणाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. याबाबत अनाथांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते अभय तेली म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची ही मागणी होती. कारण अनाथ व्यक्तींना आसरा मिळत नाही. अठरा वर्षांपर्यंत शासनाचा आधार मिळतो. परंतु, त्यानंतर अनाथांना समाजात एकटेच जगावे लागते. तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोणतेही कागदपत्र हातात नसतात. त्यामुळे अनाथ व्यक्ती खूप निराश होऊन जाते. म्हणूनच त्यांना घराची अत्यंत आवश्यकता असते. या आरक्षणामुळे आता हक्काचे घर मिळणार आहे.’’ अनाथांच्या या आरक्षणासाठी आमदार बच्च कडू यांनी सातत्याने विधानसभेत प्रश्न मांडले होते. तसेच आंदोलने केली होती. दरम्यान, सिडको मध्येही १ टक्का आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. 

अनाथांना दिलेले आरक्षण हे शिक्षण, नोकरी किंवा शिष्यवृत्तीपुरते न ठेवता अपंगाप्रमाणे सर्व विभागामध्ये दिले पाहिजे. तसेच अनाथांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करावे. तरच त्यांना पुढील आयुष्य चांगल्या प्रकारणे जगता येईल. - अभय तेली, स्वनाथ सामाजिक संस्था 

अनाथांना म्हाडाच्या योजनेत १ टक्का आरक्षण हा योग्य निर्णय आहे. पण आता १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना पुढील शिक्षण घेण्यासाठी अनुरक्षणगृह असले पाहिजे. कारण १८ वर्षानंतर बालगृहातून बाहेर पडल्यावर त्यांना कुठे जायचे ? असा प्रश्न पडतो. त्यामुळे किमान पायावर उभे राहता येईल, तोपर्यंत शासनाने मदत करणे आवश्यक आहे. - सुलक्षणा आहेर, सामाजिक कार्यकर्ती 

‘लोकमत’ने फोडली वाचा ‘अनाथांना घर मिळेल का घर?’ असे वृत्त देऊन ‘लोकमत’ने प्रथम या अनाथांच्या मागणीला वाचा फोडली होती. त्यानंतर अनाथांची राज्यस्तरीय संघटना स्थापन झाली आणि त्याद्वारे या मागणीचे निवेदन सरकारला दिले होते. 

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडाGovernmentसरकारHomeघर