महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक; यंदा देशभरातील १५२ जणांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 07:02 IST2021-08-13T07:01:51+5:302021-08-13T07:02:03+5:30
गृहमंत्रालयाकडून सीबीआयच्या १५ अधिकाऱ्यांसह देशभरातील एकूण १५२ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक; यंदा देशभरातील १५२ जणांचा गौरव
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : गुन्हेगारी प्रकरणांची उत्कृष्टपणे उकल तसेच गुन्हा सिद्धतेबाबत महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. गृहमंत्रालयाकडून सीबीआयच्या १५ अधिकाऱ्यांसह देशभरातील एकूण १५२ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उमेश पाटील, सहायक पोलीस आयुक्त पद्मजा अमोले, प्रीती टिपरे, पोलीस उपधीक्षक बाबूराव महामुनी, अजीत टीके, पोलीस निरिक्षक ममता डिसुजा, मनोहर पाटील, एपीआय अलका जाधव, राहुल भाउरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील ११, उत्तर प्रदेशातील १०, तामिळनाडूचे ८, बिहारचे ७, गुजरात, कर्नाटक व दिल्लीचे प्रत्येकी ६ आणि राजस्थान व केरळच्या प्रत्येकी ९ कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तपासात उच्च मापदंड, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, असाधारण साहसाचा परिचय देणाऱ्यांना या सन्मानाने गौरविण्यात येते.