शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी..."; राज ठाकरेंच्या सभेआधी गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 12:41 IST

Dilip Walse Patil And MNS Raj Thackeray : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या सभेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची तोफ आज 1 मे रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर धडाडणार आहे. 'मशिदीवरील भोंगा हटाव' मोहीम हाती घेतल्यानंतर राज ठाकरे यांची सभा होत असल्याने व्यासपीठ कसे असणार याची सर्वांना उत्सुकता होती. यातच राज ठाकरे यांच्या सभेच्या व्यासपीठामागे भगव्या पडद्यावर राजमुद्रा आणि रेल्वे इंजिन दिसत आहेत. तसेच शहरात आणि सभास्थळी लावलेल्या भगव्या झेंड्यांवर देखील रेल्वे इंजिन दिसल्याने चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राज ठाकरे यांच्या सभेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्र्यांना राजकीय सभा आणि सुव्यवस्था यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला त्यांनी उत्तर दिलं आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशी विनंती केली आहे. "राजकीय सभा आणि राजकीय कार्यक्रम लोकशाहीत सुरूच असतात. कायदा आणि सुव्यवस्था तसेच राज्यात शांतता ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असते. यादृष्टीने संपूर्ण पोलीस विभाग तयारी करत आहे. ते सज्ज आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, अशी अपेक्षा आहे. अशा काही घटना घडल्यास त्याला सामोरं जाण्यासही पोलीस तयार आहेत. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशी विनंती आहे" असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीनंतर राज्यात दंगली होतील का? असे याआधी गृहमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात दंगली होतील असे काही वातावरण नाही. मात्र पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. देशात काही राज्यात दंगे झाले आहेत. महाराष्ट्रातही तसे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. पण, महाराष्ट्रात पोलीस तयारीत आहेत. जे कुणी असा प्रयत्न करत असतील त्यांना जशास तसे उत्तर देऊ. देशासमोर महागाई, सीमा सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अशी अशांतता काही घटक निर्माण करत आहेत. हे घटक कोण आहे ते पोलीस तपासात समोर येईल असंही त्यांनी सांगितलं होतं.  

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण