शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री देशमुख यांनी चुकीचे काहीही केलेले नाही - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 03:38 IST

फडणवीस यांनी तपास यंत्रणेला सीडीआर देण्याची केली मागणी; कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत वा बाहेरही  बोलताना अँटिलिया प्रकरणी योग्य ती माहिती दिली. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा सीडीआर (कॉल रेकॉर्ड्स) असेल तर तो त्यांनी एटीएसकडे द्यावा, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. (Home Minister Deshmukh has not done anything wrong saied Jayant Patil)पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील,मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याशी शरद पवार यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी स्पष्ट केले की, अँटिलिया, सचिन वाझे प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सचिन वाझेंसंदर्भात कारवाई करण्यास विलंब झाल्याच्या आरोपाचाही पाटील यांनी यावेळी इन्कार केला. काही अधिकाऱ्यांचा घटनेत सहभाग असेल तर त्यांची हयगय केली जाणार नाही. या प्रकरणात दाेषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्यासंदर्भात तपास यंत्रणा योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याच्याशी मंत्र्यांचा काहीही संबंध नाही. तपास यंत्रणेशी निगडित बाबींवर मंत्र्यांनी बाेलणे याेग्य हाेणार  नाही. तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तपास करणाऱ्या त्या यंत्रणेने बोलणे अपेक्षित आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस