शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

'घरगुती शिकवण्यांवर निर्बंध नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 4:23 AM

इंटिगे्रटेड क्लासेस म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ही कीड घालविण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा करणार आहे.

नागपूर : इंटिगे्रटेड क्लासेस म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ही कीड घालविण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा करणार आहे. मात्र, या कायद्यामुळे घरगुती शिकवणीवर कसलेच निर्बंध येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले.राज्यात खासगी शिकवण्यांचे फुटलेले पेव, इंटिग्रेटेड क्लासेसमुळे महाविद्यालयांचे कमी हाणारे महत्त्व याबाबतची लक्षवेधी सूचना भाजपा सदस्य पराग अळवणी यांनी आज विधानसभेत मांडली. इंटिग्रेटेड क्लासेसच्या नावाखाली खासगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांमध्ये अभद्र युती झाली आहे. या विरोधात कठोर कारवाई करतानाच बायोमेट्रिक अटेंडन्स अनिवार्य करण्याची मागणी पराग अळवणी यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना शिक्षण मंत्री तावडे म्हणाले की, स्पर्धा परीक्षांतील यश आणि जाहिरातबाजीच्या जोरावर कोचिंग क्लासेसवाले पालकांना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेलच करीत असतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा आणणार आहे. इंटिग्रेटेडमुळे शाळांमध्ये जाण्याची आवश्यकता नसल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रूढ होते. यावर नियंत्रण आणण्यासाठी महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली. यातही काही क्लासेस आणि महाविद्यालयांनी पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. आता गुगल आणि सॅटेलाईट मॅपिंग असणारे बायोमेट्रिक मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे फक्त ठसा लावून कागदोपत्री हजेरी दाखवली जात आहे की विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत आहे, याची माहिती उपलब्ध होणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. एकीकडे इंटिग्रेटेड क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा केला जात असतानाच राज्यातील शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले. त्यासाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची फेरमांडणी केली आहे. सीबीएसई किंवा आयसीएसई शाळांशी टक्कर घेता येईल अशी व्यवस्था केली जात आहे. गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करतानाच इंटिग्रेटेड क्लासेसवर निर्बंध घालणारा कायदा केला जात आहे. मात्र, अनेकदा लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे काही निर्णय फिरवावे लागतात. त्यामुळे इंटिग्रेटेड क्लासेस अथवा त्यांच्याशी संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल. कारवाईचा बडगा उगारल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही कारवाई रोखण्याचा हट्ट करू नये, असे आवाहनही तावडे यांनी केले. या कायद्यामुळे घरगुती अथवा अगदी छोट्या क्लासेसवर कारवाई केली जाणार नाह, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.>अल्पसंख्याक संस्थांमधील सामाजिक आरक्षणाबाबत न्यायालयाचा प्रतिकूल निकाल आला असला तरी अशा संस्थांना नियमानुसार कामकाज करणे भाग आहे. अशा अनेक संस्थांच्या संचालक मंडळावर नियमानुसार किमान ५० टक्के अल्पसंख्यांक संचालक असतात. मात्र,संबंधित अल्पसंख्यांक समाजातील ५१ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा नियम मात्र पाळला जात नाही. जर, हा नियम पाळला जात नसेल तर सामाजिक आरक्षण लागू करावे, यासाठी सरकार दबाव टाकेल अशी भूमिका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी मांडली.

टॅग्स :nagpurनागपूर