शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

गेल्या २५ दिवसांत सात हजार कोटींची गृहखरेदीे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 06:10 IST

मागील सप्टेंबरपेक्षा या वर्षी जास्त खरेदी-विक्री; मुद्रांक शुल्क कपातीची मात्रा पडली लागू

संदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा प्रचंड मोठा फटका गृहनिर्माण क्षेत्राला बसला होता. मात्र, राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली घसघशीत सवलत आणि विकासकांनी विविध सवलतींच्या माध्यमातून कमी केलेल्या किमतींमुळे मालमत्तांच्या खरेदी - विक्रीने आश्चर्यकारक भरारी घेतल्याचे दिसते.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईत ४०३२ मालमत्तांचे व्यवहार नोंदविले गेले होते. यंदा कोरोनाचे संकट गडद होत असतानाही २५ सप्टेंबरपर्यंत या व्यवहारांनी ४४०० चा पल्ला गाठला आहे. त्यातून मिळालेल्या मुद्रांक शुल्काचा ताळेबंद मांडल्यास सुमारे ७ हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तांचे व्यवहार शहरांत झाल्याचे स्पष्ट होते.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात एकाही घर, जमीन किंवा व्यावसायिक मालमत्तेचा व्यवहार झाला नव्हता. मे महिन्यात ती संख्या २०७ पर्यंत गेली. जून, जुलै आणि आॅगस्टमध्ये मजल दरमजल करत अनुक्रमे १८३९, २६६२ आणि २६४२ असे व्यवहार नोंदविले गेले होते. त्यात आता अनपेक्षित वाढ होताना दिसत असून, यंदा महिनाअखेरीपर्यंत ती संख्या ५००० पर्यंत जाईल अशी चिन्हे आहेत.

कोसळलेल्या बांधकाम व्यवसायाला सावरण्यासाठी राज्य सरकारने डिसेंबर, २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के तर त्यानंतर मार्च, २०२१ पर्यंत दोन टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यानंतर विकासकांनीसुद्धा उर्वरित मुद्रांक शुल्क माफी, जीएसटी माफी, विनामूल्य पार्किंग, आकर्षक पेमेंट योजना दाखल करून ग्राहकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. सरकार आणि विकासकांनी दिलेल्या सवलतींमुळे अनेक ठिकाणी घरांच्या किमती ८ ते १५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. घरांच्या खरेदी - विक्रीचे वाढलेले आकडे त्याचे परिणाम दर्शवितात. मुद्रांक शुल्कात कपात होणार याची कुणकुण आॅगस्ट महिन्याच लागली होती. त्यामुळे अनेकांनी मालमत्तांच्या खरेदी - विक्रीबाबतची बोलणी पूर्ण केली असली तरी ते व्यवहार नोंदणीकृत केले नव्हते. सरकारने सवलत जाहीर केल्यानंतर ही नोंदणी झाली. त्यामुळे आकडे वाढल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.सवलतीमुळे सरकारी महसुलात घटगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ४०३२ मालमत्तांचे व्यवहार नोंदणीकृत झाल्यानंतर मुद्रांक शुल्कापोटी सरकारी तिजोरीत ३४७ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा पहिल्या २५ दिवसांत त्यापेक्षा जास्त व्यवहारांची नोंद झाल्यानंतरही तिजोरीतील आवक १४८ कोटींपर्यंतच पोहचू शकली आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात २६४२ मालमत्तांच्या व्यवहारांपोटी १७६ कोटी रुपये सरकारला मिळाले होते. आता व्यवहार जास्त झाले असले तरी मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे महसूल घटला आहे.

टॅग्स :Homeघर