शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गुलाबी थंडीत जाणवतोय उकाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 20:27 IST

ऐन थंडीत उकाडा जाणवू लागला आहे़....

ठळक मुद्देअरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र : तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे : या हंगामात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान नेहमीपेक्षा थंडीचे प्रमाण कमी असेल, असा हवामान विभागाचा अंदाज जाहीर झाला असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे़. त्यामुळे ऐन थंडीत उकाडा जाणवू लागला आहे़.

राज्यात मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे़. कोकणात ३ ते ४ आणि मराठवार्डयात २ ते ५ अंश तर विदर्भात १ ते ३ अंश सेल्सिअसने किमान तापमानात वाढ झाली आहे़. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३४.८ तर सर्वाधिक किमान तापमान अहमदनगर येथे ११.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ २ ते ४ डिसेंबर दरम्यान कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने हिंदी महासागरात विषृववृत्तीय भागात व त्याच्या लगतच्या अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़ त्याचवेळी लक्ष्यद्वीप बेटांच्या समुहाजवळ आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे़. त्यामुळे लक्ष्यद्वीप, केरळ, तामिळनाडु, पाँडेचरी भागात पाऊस होत आहे़. त्याचा परिणाम दक्षिणेकडील वाºयांचा जोर वाढला असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे़. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागातील कमाल व किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे़. यंदा सातत्याने अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यातील तापमानात अभावाने घट झाली आहे़. राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली आहे़. दिवसाही अनेक ठिकाणी उकाडा जाणवत होता़ ब्रम्हपुरी येथे शनिवारी ३२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली़ ती सरासरीच्या तुलनेत ३़५ अंश सेल्सिअसने अधिक आहे़. रविवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहिल़ २ ते ४ डिसेंबरदरम्यान कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. ़़़़़़़़़राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

पुणे १७.४, लोहगाव १९.२, अहमदनगर ११.२, जळगाव १८, कोल्हापूर २१.१, महाबळेश्वर १६.५, मालेगाव १८.६, नाशिक १७.३, सांगली २१.१, सातारा १७.६, सोलापूर २१.५, मुंबई २३.५, अलिबाग २३.६, रत्नागिरी २४.८, पणजी २४.४, डहाणु २३, उस्माऱ्या नाबाद १४.८, औरंगाबाद १६.९, परभणी १७.२, नांदेड १७, बीड १९.५, अकोला १६.९, अमरावती १७, बुलढाणा १७.६, ब्रम्हपुरी १७.३, चंद्रपूर १८.६, गोंदिया १५.४, नागपूर १५.८, वाशिम १७, वर्धा १७.५, यवतमाळ १६.४़                    

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन