शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

इतिहास वस्तुनिष्ठ असायला हवा : डॉ. विक्रम संपत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 3:53 PM

लोक मला सावरकरंच का? असा प्रश्न विचारतात. पण मी ‘सावरकर’ का नाही? असा प्रतिप्रश्न करतो..

ठळक मुद्देप्रभा खेतान फाउंडेशनच्या वतीने ‘द राईट सर्कल’अंतर्गत उपक्रम

पुणे : राष्ट्रपुरुषांविषयी खरी माहिती जाणून न घेता केवळ अंधविश्वास ठेवून त्या त्या व्यक्तींबद्दल मते बनविली जात आहेत. त्या त्या काळातील महापुरुषांशी संबंधित मूळ कागदपत्रांचा अभ्यास  किंवा त्याची पडताळणी करण्याचे कुणी कष्टच घेत नाहीत. भारतात इतिहासलेखन अशाच पद्धतीने केले जाते ही दुर्दैैवी गोष्ट आहे. इतिहासाची वस्तुनिष्ठता मांडणे गरजेचे असल्याचे मत प्रख्यात लेखक डॉ. विक्रम संपत यांनी व्यक्त केले. प्रभा खेतान फाउंडेशनच्या वतीने ‘द राईट सर्कल’अंतर्गत डॉ.विक्रम संपत यांचा संवादात्मक कार्यक्रम आयोजिला होता. ‘लोकमत’ आणि  ‘अहसास’ संस्थेचे या कार्यक्रमाला सहाय्य लाभले. या वेळी अमिता मुनोत, नीलम सेवलेकर आणि सुजाता सबनीस यांच्यासह ‘अहसास’च्या महिला सदस्य उपस्थित होत्या. अतिरिक्त पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी विक्रम संपत यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. लोक मला सावरकरंच का? असा प्रश्न विचारतात. पण मी ‘सावरकर’ का नाही? असा प्रतिप्रश्न करतो, असे सांगून विक्रम संपत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपुरुषांच्या जीवनकार्याचे पुनर्मूल्यमापन केले जात आहे. त्यामध्ये सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याकडे अभ्यासक पुन्हा वळले आहेत. पण मागे वळून पाहिले तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर.  महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांमध्ये सावरकरांच्या हिंदुत्वाबद्दल वेगळा मतप्रवाह ऐकायला मिळतात. पण आज त्यांच्या हिंदुत्वाचे मूळ राजकारणातही रुजली आहेत. राष्ट्रीय सुरक्षितता, लष्कर, अर्थशास्त्र, वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्वच पातळीवर त्यांची देशाबद्दल दूरदृष्टी होती. सावरकरांच्या वारसाकडे पुन्हा वळून पाहण्याचे फारसे प्रयत्न झाले नाहीत हे दुर्दैैव म्हणावे लागेल. जे पक्ष त्यांच्या नावाचा वापर करतात, तेदेखील सावरकरांचे योगदान खुलेपणाने मान्य करीत नाहीत ही शोकांतिका म्हणावी लागेल. शेवटचे सावरकरांचे आत्मचरित्र इंग्रजीमध्ये आले होते. त्यानंतर १५ वर्षे त्यांच्यावर पुस्तक आलेले नाही. मणिशंकर अय्यर यांची सावरकरांबद्दलची वक्तव्ये, रणजित सावरकर यांनी राहुल गांधींवर अब्रू नुकसानीचा दाखल केलेला दावा, या सर्व घडामोडींनंतर सावरकरांवर पुस्तक लिहिल्याची प्रेरणा मिळाली. .....सावरकरांना  ‘कायर’ म्हणणे मूर्खपणाचे४सावरकरांनी सुटकेसाठी अर्ज दिला असे म्हणता येणार नाही. केवळ अर्ज केला होता. जो प्रत्येक राजकीय कैद्याचा अधिकार आहे. कैद्याचा अधिकार समजून घेतला पाहिजे. पण त्यांना सामान्य कैद्याची वागणूक देण्यात आली. ४काँग्रेसच्या एकाही राजकीय कैद्याला सेल्युलर जेलमध्ये जावे लागले नाही. सावरकरांना तर कुटुंबाला पण भेटू दिले जात नव्हते. कैद्याने अर्ज करणं नॉर्मल आहे. पण त्यांना एकीकडे वीर आणि दुसरीकडे कायर, असं म्हणणं मूर्खपणाचं असल्याचं संपत यांनी सांगितले. .......पोलीस खात्यातील एका व्यक्तीने लेखकाशी संवाद साधला याचे कौतुक वाटले. डॉ. विक्रम संपत या विषयावर अत्यंत  मोकळेपणाने आणि अभ्यासातून व्यक्त झाले. त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे उत्कटतेने  वस्तुस्थिती दर्शवत दिली. सर्व तरुण आणि वृद्धांनी त्यांचे हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. कारण सावरकर हे महाराष्ट्रीय लोकांच्या हृदयाजवळचे आहेत.- अमिता मुनोत, अहसास.......आम्ही आजपर्यंत ’कलम’ या संवादात्मक कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक लेखकांना पुढे आणले.  पण  ‘द राईट सर्कल’ अंतर्गत इंग्रजी लेखकांना संधी देत आहोत. पुणे आणि सावरकरांचे अतूट नाते आहे. डॉ. विक्रम संपत यांनी सावरकरांबद्दल पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे पहिल्या कार्यक्रमासाठी त्यांना आम्ही आमंत्रित केले.- सुजाता सबनीस, अहसास......पुण्यात इंग्रजी लेखकांनादेखील बोलावण्यात यावे अशी मागणी होती. लोकांना सावरकरांविषयी माहिती व्हावी आणि डॉ. विक्रम संपत यांचे सावरकरांवर पुस्तक पण आले होते. - नीलम सेवलेकर.......डॉ. विक्रम संपत यांच्या पुस्तकातून सावरकर यांच्यावरील माहिती नसलेल्या गोष्टी समोर येतील. ज्या बहुतांश लोकांना माहिती नाहीत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील सावरकरांचे कैैदी असतानाचे छायाचित्र छापले आहे. तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहण्यासारखे आहे. - मनोज मेनन, उपाध्यक्ष, हॉटेल ओ     

टॅग्स :PuneपुणेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरhistoryइतिहास