शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

‘त्याचे’ पाकिस्तानला येणे-जाणे होते

By admin | Published: May 23, 2017 3:43 AM

कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत काहीसा सुटकेचा नि:श्वास भारताने टाकला. मात्र शेख नबी अहमद नामक भारतीयाला पाकिस्तानने अटक केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी प्रसारित केले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत काहीसा सुटकेचा नि:श्वास भारताने टाकला. मात्र शेख नबी अहमद नामक भारतीयाला पाकिस्तानने अटक केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी प्रसारित केले आणि शेखच्या नातेवाइकांचा शोध दिवसभर प्रसारमाध्यमांनी घेतला. मात्र त्याच्या नातेवाइकांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे.शेख हा काही वर्षांपूर्वी जोगेश्वरी पूर्व परिसरात राहत होता. पाच वर्षांपूर्वी तो येथून बेपत्ता झाला. त्याचे नातेवाईक अंबोलीतील दिवाण सेंटरजवळ मीना हॉटेलच्या शेजारी असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला. मात्र त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.कुलभूषण जाधव यांचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही वाच्यता आम्हाला करायची नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखदेखील याच्या कुटुंबासह अंबोलीत राहत होता. त्याचे पाकिस्तानला येणे-जाणे होते. मात्र कोणत्या कारणासाठी तो ये-जा करायचा हे समजू शकले नाही. त्याला पाकिस्तानात पकडले गेले तेव्हा मी भारतीय आहे, असे त्याने सांगितले. त्याच्याकडे पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. १९ मे रोजी त्याला अटक झाल्याचे वृत्त पाक प्रसारमाध्यमांनी दिले. मात्र पाक सरकारने त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.