Pratap Sarnaik News: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशने त्यांच्या CSR फंडातून राज्यभरातील महत्वाच्या एसटी बसस्थानकावर स्तनदा मातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयीसह ' हिरकणी कक्ष ' उभे करावेत, असे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशने पहिल्या टप्प्यात ५१ बसस्थानकावर ' हिरकणी कक्ष ' उभारुन देण्याची ग्वाही दिली.
तसेच राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट) विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ' ट्रेड प्रमाणपत्र ' रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले. ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते.
'मल्टी ब्रँड आउटलेट '(MBO) सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झालेली आहे. राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनाधिकृत वाहन विक्री करीत असतात. राज्यात इतर विभागातून तसेच परराज्यातून नवीन वाहने आणून ' ट्रेड प्रमाणपत्र ' नसताना अनाधिकृतरित्या वाहन विक्री करतात . भविष्यात अशा अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या अधिकृत वाहने विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले. दरम्यान, या बैठकीमध्ये ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांच्या वर चर्चा झाली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहिले.
Web Summary : Following Pratap Sarnaik's appeal, 51 ST bus stations will get 'Hirkani Rooms' for lactating mothers, funded by automobile dealers' CSR. Sarnaik also directed action against unauthorized vehicle sellers.
Web Summary : प्रताप सरनाईक की अपील के बाद, ऑटोमोबाइल डीलरों के सीएसआर फंड से 51 एसटी बस स्टेशनों पर स्तनपान कराने वाली माताओं के लिए 'हिरकणी कक्ष' बनाए जाएंगे। सरनाईक ने अनधिकृत वाहन विक्रेताओं के खिलाफ भी कार्रवाई करने का निर्देश दिया।