हिंगोलीत दुकानांसह वाहनांवर दगडफेक!
By Admin | Updated: January 14, 2015 04:09 IST2015-01-14T04:09:27+5:302015-01-14T04:09:27+5:30
सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व्यंगचित्र टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास जमावाने शहरातील गांधी चौक

हिंगोलीत दुकानांसह वाहनांवर दगडफेक!
हिंगोली : सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व्यंगचित्र टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास जमावाने शहरातील गांधी चौक परिसरात धुडगूस घालत दुकाने व वाहनांवर दगडफेक करून अनेकांना मारहाण केली़ या प्रकरणी तिघांंना अटक करण्यात आली़ तर आक्षेपार्ह व्यंगचित्र टाकणाऱ्या डॉक्टरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल नेटवर्किंगवरील गैरप्रकाराचा निषेध करीत काहीजण उपविभागीय पोलिस अधिकारी लांजेवार यांच्या कार्यालयाकडे निवेदन देण्यास गेले. डॉक्टर असोसिएशनच्या ग्रुपमध्ये एका डॉक्टरने हे आक्षेपार्ह व्यंगचित्र टाकल्याचे त्यांचे म्हणने होते. मात्र, तक्रार दिली नव्हती. नंतर याबाबत अफवा पसरली. त्याचवेळी काही मुलांचे टोळके व्यापाऱ्यांना दुकाने करण्यास भाग पाडू लागला. गांधी चौकात हा जमाव पोहोचल्यानंतर गोंधळ सुरू झाला. मंगळवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने गर्दी होती़ त्याचवेळी काही लोकांनी जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावल्याने आणि घोषणाबाजी सुरू झाल्याने नागरिकांची पळापळ सुरू झाली. अनेक दुकाने, वाहनांवर दगडफेक झाली. पोलिस दाखल झाल्यानंतरही गोंधळ सुरूच होता. लोकप्रतिनिधी व पोलिसांनी शांततेचे आवाहन करीत व्यापाऱ्यांना दुकाने उघडायला लावली. दुपारनंतर बाजारपेठ पूर्ववत झाली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात येऊन २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ उर्वरित संशयितांच्या अटकेसाठी पोलीस पथके पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)