शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

मंत्रिपद दिलं तर माझ्यात पुन्हा दहा हत्तीचं बळ येईल - संतोष बांगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 19:11 IST

Santosh Bangar : बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही मागून घेणारा नाही. बाळासाहेबांचे आशीर्वादच असे होते की शब्द टाकला की पूर्ण होत होता, असे संतोष बांगर यांनी सांगितले. 

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिंदे गटातील शिवसेना आमदार संतोष बांगर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा धक्का दिला आहे. संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष बांगर आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुंबईकडे रवाना होणार आहेत. 

दरम्यान, संतोष बांगर यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही आक्रमक आहात, कार्यकर्त्यांकडून मंत्रिपदाची मागणी केली जात आहे. तुम्हाला काय वाटते, मंत्री मिळेल का? असे विचारले. यावर "मंत्रिपद कोणाला नको. मंत्रिपद देत असतील तर पुन्हा दहा हत्तींचं बळ माझ्यात येईल आणि मी पुन्हा शिवसैनिक वाढवल्याशिवाय राहणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे," असे संतोष बांगर म्हणाले.

याचबरोबर, मी मंत्रिपदाच्या अपेक्षेने कुठलंही काम करत नाही. माझ्या नेत्यांना माझ्यावर विश्वास असेल तर मुख्यमंत्री जे आदेश देतील, त्या आदेशाचे मी पालन करणारा कडवट शिवसैनिक आहे. साहेबांच्या मनात असेल तर माझ्यावर जबाबदारी टाकतील. मी स्वतः मंत्रिपद मागणार नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही मागून घेणारा नाही. बाळासाहेबांचे आशीर्वादच असे होते की शब्द टाकला की पूर्ण होत होता, असे संतोष बांगर यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदेसाहेब तसेच बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे यांना वाटलं जबाबदारी द्यायची तर ते देतील. नाही दिली तरी मी सदैव शिवसेनेचा आमदार म्हणून कामासाठी तत्पर राहीन. मला मंत्रिपद मिळावे अशी अनेक कार्यर्त्यांच्या भावना आहे. तसे ते बोलून देखील दाखवतात. पण मुख्यमंत्री जे ठरवतील ते मान्य असेल, असे संतोष बांगर म्हणाले.

याशिवाय, मंत्रिपद कोणाला नको. मंत्रिपद देत असत तर पुन्हा दहा हत्तींचं बळ माझ्यात येईल आणि मी पुन्हा शिवसैनिक वाढवल्याशिवाय राहणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. शिवसेनेचा मंत्री कसा असावा,  शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कसा असावा, आमदार कसा असावा, हे मी सांगत तर आजूबाजूच्या परिसरातील लोकही सांगतात, असे संतोष बांगर यांनी म्हटले आहे.

संतोष बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवलंसंतोष बांगर हे पक्षातून बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर हिंगोली जिल्हा भरात शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हा प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. शिवसेनेकडून हा मोठा धक्का संतोष  बांगर यांना दिला गेला आहे. २००९ पासून आमदार संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. संतोष बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर आता नवीन जिल्हा प्रमुख निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचपणी करीत आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे