हिंगोली - वीज पडून २ ठार, ३ जखमी
By Admin | Updated: September 22, 2016 16:57 IST2016-09-22T16:57:43+5:302016-09-22T16:57:43+5:30
वसमत तालुक्यातील धामनगाव येथे विज पडून 2 ठार, 2 जखमी तर 1 गंभीर जखमी आहे.

हिंगोली - वीज पडून २ ठार, ३ जखमी
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. २२ - वसमत तालुक्यातील धामनगाव येथे विज पडून 2 ठार, 2 जखमी तर 1 गंभीर जखमी आहे.आज दुपारी झालेल्या पावसात वसमत तालुक्यातील धामनगाव येथे वीज पड़ल्याने झाड़ाख़ाली उभे असलेले नितिन प्रकाश खंदारे मूळ गांव गोरेगांव, तालुका सेनगाव वय अंदाजे 35 व एका कापूस बियाणे कंपनीचा कर्मचारी MR अद्याप ओळख पटली नाही हे दोघे ही जागीच ठार झाले आहेत.
वसमत पंचायत समिती सभापती राहुबाई बेले यांचा मुलगा सदाशिव पांडोजी बेले वय अंदाजे 35 वर्ष, रवी भगवांन खंदारे वय अंदाजे 25 वर्ष, चांदोजी बोखारे वय अंदाजे 30 वर्षे हे तीन जण चांगलेच जखमी झाल्याने त्यांना वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही नांदेड येथे हलवण्यात आले आहे.