शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Hinganghat Burnt Case : महाराष्ट्रभर आक्रोश आणि संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 04:49 IST

राज्यभर शोककळा : अनेकांना भावना अनावर; ठिकठिकाणी बंद, गावोगावी श्रद्धांजली

हिंगणघाट (वर्धा) : गेल्या सोमवारी नंदोरी चौकात प्राध्यापिका तरुणीवर अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी या प्रकरणातील पीडित तरुणीची प्राणज्योत मावळली. या घटनेची वार्ता पसरताच राज्यभरात तीव्र पडसाद उमटले.

नागपूर येथून पीडिताचा मृतदेह रुग्णवाहिकेतून तिच्या मूळगावी आणण्यात आला. गावशिवेवर रुग्णवाहिका पोहोचताच संतप्त जमावाने रुग्णवाहिकेवर दगडफेक केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी आप्तेष्टांनी भूमिका घेतली. सायंकाळी ५ वाजता वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी शासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिले.

यात या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासोबतच आरोपीला कठोर शिक्षा, मृत तरुणीच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी, कुटुंबीयाला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन कोरडे यांनी शासनाच्यावतीने दिले. आश्वासनाचा लेखी कागद शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांनी स्मशानभूमीत याबाबतची माहिती वाचवून दाखविली. त्यानंतर अंत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला.

पार्थिव गावात येताच रुग्णवाहिका रोखून धरण्याचा प्रयत्ननागपूर येथील आॅरेंजसिटी रूग्णालयातून ‘ती’चे पार्थिव आल्यानंतर गाववेशीवरच संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका रोखून धरली. दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना जमाव पांगविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. पोलीस बंदोबस्तात पार्थिव घरी आणले. तेव्हा कुटुंबीय, आप्तेष्टांसह साऱ्यांनाच अश्रू अनावर झाले.

आरोपीचे कुटुंबीय अज्ञातवासात३ फेब्रुवारीला घडलेल्या अमानवीय घटनेनंतर गावातील संतप्त वातावरणाचा अंदाज लक्षात घेऊन आरोपीचे आई-वडील आणि बहीण ४ फेब्रुवारीलाच सायंकाळी बाहेरगावी आपल्या नातेवाइकांकडे रवाना झाले आहे. त्यांचे घर कुलूपबंद आहे. सुरुवातीला आरोपीचे कुटुंबीय येथेच राहण्याच्या मानसिकतेत होते. दरम्यान गावातही शांतता होती. नंतर इतरत्र जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.रुग्णवाहिकेवर फुले फेकून वाहिली श्रद्धांजलीनागपूर येथून गावाकडे तिचे पार्थिव आणले जात असताना वाटेत शेकडोंच्या संख्येत असलेल्या शोकमग्न नागरिकांनी रूग्णवाहिकेवर फुले फेकून तिला श्रद्धांजली अर्पण केली.‘ती’ची शैक्षणिक वाटचालहिंगणघाट तालुक्यातील छोट्याशा गावातून शैक्षणिक भरारी घेणारी प्राध्यापिका गावातील अनेकांसाठी आदर्श होती. शेतकरी कुटुंबात वाढलेली आणि कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर तिने अध्यापन क्षेत्रात आली होती. तिच्या शैक्षणिक जीवनात सोबत राहिलेल्या शिक्षकांसह मित्र-मैत्रिणींच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळले.तिचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदच्या शाळेतून झाले. त्यानंतर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण तिने हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातून घेतले. बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने बी.एस्सीचे शिक्षण हिंगणघाटच्या रा. सु. बिडकर महाविद्यालयातून घेतले. एम.एस्सीकरिता तिने वर्ध्यातील जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय गाठले. येथेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर येळाकेळीच्या अध्यापक महाविद्यालयातून बी.एडचे शिक्षण घेऊन अलीकडचे काही दिवसांपासून हिंगणघाटच्या महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून रुजू झाली होती.खटला प्राधान्याने, वेगाने चालविणारनरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्राध्यापिकेवर भररस्त्यात पेट्रोल ओतून जिवंत पेटवून देण्याचे हे प्रकरण अतिशय क्रूर अन् गंभीर आहे. त्यामुळे हा खटला प्राधान्याने चालवायचा आहे. मात्र, प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर झाल्यानंतरच आपली भूमिका सुरू होणार आहे, असे मत सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी मांडले.खटल्याच्या संबंधाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी सोमवारी अ‍ॅड. निकम यांची चर्चा झाली. या चर्चेचा सूर काय होता, ते जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने अ‍ॅड. निकम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लोकमतजवळ उपरोक्त प्रतिक्रिया नोंदवली.अ‍ॅड. निकम म्हणाले, पोलीस या प्रकरणाचा तपास पूर्ण करून लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतील. तत्पूर्वीची कायदेशीर प्रक्रिया वेगात मात्र निकोपपणे पार पाडली जाणार आहे. खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर आपण आपली भूमिका पार पाडू.पीडितेच्या वडिलांशी बोलणीअ‍ॅड. निकम यांनी पीडितेच्या वडिलांशीही फोनवरून संवाद साधला. या प्रकरणात आपण कायदेशीर लढाई लढून नक्की न्याय मिळवू, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Hinganghatहिंगणघाटfireआग