शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:48 IST

मराठी आणि हिंदी स्पर्धा झाली तर मराठीलाच प्राधान्य आहे. मराठीपुढे इतर कुठलीही भाषा नाही हे आमचे मत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मुंबई - मी कुणासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. महापालिका निवडणुका नसत्या तर कदाचित या निर्णयाला इतका वेगळा विरोध झाला नसता. राज ठाकरेंची भूमिका आणि आमची भूमिका वेगळी आहे. सगळ्याच भूमिका सारख्या असत्या तर एका पक्षात राहिलो असतो. भूमिका वेगळी असू शकते. परंतु उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि त्याविरोधातच आता बोलतायेत. याचा अर्थ राजकीय आहे. या राज्यात माशेलकर, मुणगेकर यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल का? देवेंद्र फडणवीसांना राजकारण करायचे आहे असं बोला, पण तज्ज्ञांनी एखादा रिपोर्ट दिला. तो तुम्ही मुख्यमंत्री असताना स्वीकारला आणि आता त्याउलट जात आहात याचा अर्थ हे मराठीचे प्रेम नाही तर हे राजकीय आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे, हिंदी सक्ती नाही. हिंदी पर्यायी भाषा आहे. हिंदी किंवा अन्य कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र दिले आहे. हे सूत्र आपण स्वीकारले आहे. जेव्हा २०२० साली हे धोरण आले तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या धोरणावर अभ्यास करण्यासाठी कमिटी तयार केली. त्याचे अध्यक्ष माशेलकर होते. त्यात डॉ. मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख १८ मंडळी होती. या सर्वांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो २०२१ साली उद्धव ठाकरे सरकारला दिला. तो रिपोर्ट तेव्हाच्या सरकारने स्वीकारला. हा तोच रिपोर्ट आहे ज्यात त्रिभाषा सूत्र सांगितले आहे आणि त्यात स्पष्टपणे मराठीसोबत इंग्रजी आणि हिंदी सक्ती करा असं अहवालात म्हटले आहे. त्यावेळच्या बातम्या पाहा, वेगवेगळ्या भाषा शिकायला हव्यात असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांना महाराष्ट्रद्रोही ठरवणार आहात का? असा सवाल त्यांनी विचारला. न्यूज १८ लोकमतच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

तसेच काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. ही एक प्रक्रिया आहे त्यात आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजे त्यादृष्टीने तयार केलेले त्रिभाषा सूत्र आहे. विद्यार्थ्यांचे जे ब्रेन आहे ज्यात सर्वात जास्त भाषा शिकवण्याचा काळ कधी आहे याचा अभ्यास करून त्यावेळी या भाषा मुलांना शिकवल्या तर अधिक भाषा ते शिकू शकतात हे समोर आले आहे. हा आमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय नाही. हिंदी शिकली पाहिजे असे नाही कुठलीही भाषा शिका. हिंदी सक्तीचा हा प्रश्न नाही. हिंदी भाषेला विरोध आहे. या लोकांचा विरोध हिंदीला आहे. भारतात तुम्हाला इंग्रजी चालते, इंग्रजीला विरोध नाही. हिंदीला विरोध आहे. हा विरोधाभास आहे. मराठी आणि हिंदी स्पर्धा झाली तर मराठीलाच प्राधान्य आहे. मराठीपुढे इतर कुठलीही भाषा नाही हे आमचे मत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, मराठी आमची मायबोली आहे. सक्ती मराठीच हवी. पण आपल्या मुलांना तीन भाषा शिकायला हव्यात अन्यथा नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे मुलांना क्रेडिट मिळणार नाही. त्याला क्रेडिट मिळाले नाही तर उद्या तो आयआयटी, एम्स, सीईटी, मेडिकलला जाईल त्यावेळी त्याचे क्रेडिट कमी पडतील. त्यामुळे चांगले मार्क्स घेऊनही क्रेडिटचे मार्क दुसऱ्याजवळ जास्त असल्याने त्याला प्रवेश मिळाला नाही तर हे विद्यार्थ्याचे नुकसान आहे. आपल्या मराठी मुलांचे नुकसान होईल. भावनेपेक्षा वस्तूस्थिती समजून घेतली पाहिजे. आपण जेव्हा सत्तेत असतो तेव्हा वस्तूस्थिती समजून घ्यायची, कमिटी बनवायची, रिपोर्ट स्वीकारायचा आणि विरोधी पक्षात गेल्यावर भूमिका बदलायची असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेhindiहिंदीmarathiमराठी