आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर

By Admin | Updated: August 17, 2014 02:03 IST2014-08-17T02:03:13+5:302014-08-17T02:03:13+5:30

15 ऑगस्ट रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो सर करून भारताचा तिरंगा फडकावला आणि स्वातंत्र्यदिन साजरा केला़

The highest peak of Africa | आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर

आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर

>सोलापूर : सोलापूरचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने वर्ल्ड पीस सेव्हन समिट मोहिमेंतर्गत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो सर करून भारताचा तिरंगा फडकावला आणि स्वातंत्र्यदिन साजरा केला़ आनंदने सर्वोच्च शिखर सर केल्याचा आनंदोत्सव आपल्या गिटारद्वारे राष्ट्रगीताची धून वाजवून साजरा केला़
लिम्बा बुक, युनिक वर्ल्ड रेकॉर्डवीर आनंद बनसोडे याने जगातील सात खंडातील सात शिखर सर करण्याची मोहीम आखली आह़े त्याअंतर्गत मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात माऊंट एव्हरेस्ट 2क्12 मध्ये त्याने सर केल़े आता 2क्14 मध्ये युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रुस सर केल़े त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी या मोहिमेचा तिसरा टप्पा पार करत आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो हा ज्वालामुखी शिखर सर करत एक नवा इतिहास रचला़
स्वातंत्र्यदिनी भारतीयांची मान अभिमानाने उंचावत सोलापूरच्या गिर्यारोहक आनंदने शिखरावर भारताच्या राष्ट्रगीताची धूनही आपल्या गिटारद्वारे वाजविली़ आनंदने ही मोहीम एकटय़ाने पूर्ण केली असून, या मोहिमेतून पर्यावरण बचावचा असा संदेश दिला आह़े
 
च्आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो टांझानिया देशात आह़े याची उंची 19,34क् फूट आह़े टांझानियाच्या उत्तरेला ज्वालामुखी पर्वत आह़े हा पर्वत तीन जिवंत ज्वालामुखींनी बनलेला आह़े त्यांची नावे कीबो (19,34क्), मेवान्झी (16,986), शिरा (13,क्क्क्) अशी आहेत़ किलीमांजारो हा जगातील सर्वात मोठा फ्री स्टँडिंग प्रकारचा पर्वत आह़े
 
मोहिमेला आर्थिक पाठबळ
शाखा अभियंता राजेश जगताप यांच्या माध्यमातून संपर्कात आलेले मूळचे सोलापूरचे व पुणो-सोलापूरमधील अभियंता प्रमोद साठे यांनी आपल्या व्यंकटेश ग्रुपच्या माध्यमातून आनंदला या मोहिमेसाठी संपूर्ण प्रायोजकत्व दिले आह़े
 
पुढील मोहीम
आनंद आपल्या पुढील मोहिमेत ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट कोस्कीङको सर करणार आह़े

Web Title: The highest peak of Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.