साडेतीन वर्षांतील उच्चांक, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुंबईत भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 04:08 AM2018-01-23T04:08:07+5:302018-01-23T04:08:46+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घसरत असताना मुंबईकरांना मात्र पेट्रोल व डिझेल दरवाढीचा सामना करावा लागत आहे.

 High-rate petrol and diesel price hike in three-and-a-half years | साडेतीन वर्षांतील उच्चांक, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुंबईत भडका

साडेतीन वर्षांतील उच्चांक, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुंबईत भडका

Next

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घसरत असताना मुंबईकरांना मात्र पेट्रोल व डिझेल दरवाढीचा सामना करावा लागत आहे. पेट्रोलच्या दरांनी १ आॅगस्ट २०१४ नंतर प्रथमच प्रति लीटरसाठी ८० रुपयांचा आकडा ओलांडला आहे. तर आतापर्यंत डिझेलचे सर्वाधिक दर हे ३१ आॅगस्ट २०१४ साली ६७.२६ इतके होते. मात्र सोमवारी प्रति लीटर डिझेलसाठी वाहनचालकांना ६७.१० रुपये मोजावे लागले.
आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकीत सिंह यांनी सरकारला इंधनांच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने ही मोठ्या संख्येने डिझेलवर चालतात. त्यामुळे डिझेलच्या दरात वाढ झाल्यास वाहतूक खर्च वाढतो. परिणामी उत्पादकांना दरवाढ करावी लागते. त्याचा भार ग्राहकांना सहन करावा लागतो. सरकारने उत्पादन शुल्कात सातत्याने वाढ केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी असताना सरकारने त्याचा फायदा ग्राहकांना द्यायला हवा. याउलट सरकार महसुलात वाढ करण्यासाठी वेगवेगळे दर आकारत असल्याचे सिंह यांनी सांगितले.

Web Title:  High-rate petrol and diesel price hike in three-and-a-half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.