डॉन अरुण गवळी पॅरोलसाठी हायकोर्टात

By Admin | Updated: August 20, 2016 01:41 IST2016-08-20T01:41:52+5:302016-08-20T01:41:52+5:30

आजारी पत्नीवर शस्त्रक्रिया करावयाची आहे, असे कारण नमूद करून मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याने एक महिन्याचा पॅरोल मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या

In the high court for Don Arun Gawli Parroll | डॉन अरुण गवळी पॅरोलसाठी हायकोर्टात

डॉन अरुण गवळी पॅरोलसाठी हायकोर्टात

नागपूर : आजारी पत्नीवर शस्त्रक्रिया करावयाची आहे, असे कारण नमूद करून मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याने एक महिन्याचा पॅरोल मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली आहे.
ही याचिका न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली असून न्यायालयाने नागपूरचे विभागीय आयुक्त, मुंबई पोलीस, नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासन यांना नोटीस जारी केली आहे. याचिकेवर ७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. नगरसेवकाच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गवळीने प्रारंभी नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे अर्ज दाखल करून एक महिन्याच्या पॅरोलवर सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: In the high court for Don Arun Gawli Parroll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.