शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

महाराष्ट्रातील उच्च शिक्षणातील संशोधनावर अधिक भर देणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 19:24 IST

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षण कोंन्सिल (रुसा) ची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षणंमत्री  विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षणाची गुणवत्ता तसेच नजिकच्या काळात उच्च शिक्षणामध्ये करावयाच्या संशोधनाबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने तेथील प्राध्यापक व शिक्षकांची अध्यापन कार्यक्षमता वाढविण्यावर अध‍िक भर देण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

मुंबई, दि. ४- महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षण कोंन्सिल (रुसा) ची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षणंमत्री  विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षणाची गुणवत्ता तसेच नजिकच्या काळात उच्च शिक्षणामध्ये करावयाच्या संशोधनाबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने तेथील प्राध्यापक व शिक्षकांची अध्यापन कार्यक्षमता वाढविण्यावर अध‍िक भर देण्यावर सकारात्मक चर्चा झाली, या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करुन महाराष्ट्रातील विद्यापीठे देशात अग्रस्थानी आणण्याबाबत विचार झाला. महाराष्ट्रातील स्थानिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंधित क्षेत्रामध्ये सखोल संशोधन करण्याची गरज असल्याची चर्चा करण्यात आली आणि त्या दृष्टीने या समस्यांचे निराकारण करण्यासाठी नियोजनपूर्वक संशोधनात्मक कार्यक्रम आखण्याचे ठरविण्यात आले. तसेच या अनुषंगाने बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीला उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, रुसा प्रकल्प संचालक मिता राजीवलोचन, उद्योगपती राम भोगले, बाबासाहेब आंबेडकर तंत्रनिकेतन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास गायकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्राचार्य मुक्तजा मटकरी, प्राचार्य भामरे, डॉ. अपूर्वा पालकर, तसेच सर्व रुसा सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार