आजीनेच केली तिची हत्या
By Admin | Updated: August 17, 2014 02:39 IST2014-08-17T02:39:23+5:302014-08-17T02:39:23+5:30
15 ऑगस्ट रोजी एका अडीच वर्षाच्या गतिमंद मुलीला कात्रप परिसरातील गणोशघाटातील पाण्यात बुडवून हत्या करणा:या मुलीच्या आजीला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे.

आजीनेच केली तिची हत्या
>बदलापूर : 15 ऑगस्ट रोजी एका अडीच वर्षाच्या गतिमंद मुलीला कात्रप परिसरातील गणोशघाटातील पाण्यात बुडवून हत्या करणा:या मुलीच्या आजीला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आजीने या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. मात्र, सायंकाळी या मुलीचा मृतदेह सापडल्याने पोलिसांनी तपास करीत आजीला अटक केली.
केतकी जन्मापासूनच गतिमंद होती. तसेच एका पायाने अधू होती. तिला सांभाळणो अवघड जात होते. केतकीचे आई-वडील नोकरी करीत असल्याने तिला सांभाळण्याची जबाबदारी मंगला बोरसे यांच्यावर होती. केतकीचा होणारा त्रस कायमचा मिटवण्यासाठी बोरसे यांनी 15 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता या मुलीला कात्रप येथील गणोशघाटावर नेले.
झोपलेल्या अवस्थेतच या मुलीला पाण्यात फेकले व तेथून पळ काढला. हा प्रकार केल्यावर बोरसे यांनी सकाळी 8.3क् वाजता या मुलीच्या अपहरणाचे नाटय़ रचले. या मुलीला एका रिक्षात बसून आलेल्या महिलेने पळवल्याचे पोलिसांना सांगितले. अपहरण झाल्याचे कळतात पोलिसांनी त्या मुलीचा शोध सुरू केला. मात्र, सायंकाळी तिचा मृतदेह गणोशघाटात सापडल्यावर पोलिसांनाही या प्रकरणात घरच्यांवरच संशय वाढला. पोलिसांनी या प्रकरणात कसून तपास केल्यावर बोरसे हिने घडला प्रकार सांगितला. आपणच केतकीला पाण्यात फेकल्याचे तिने सांगितले. (वार्ताळर)
म्हणून केली हत्या.
केवळ ही मुलगी गतिमंद आणि अपंग असल्याने आपण असा प्रकार केला. हा प्रकार घडल्यावर काहीच सुचत नसल्याने आपण अपहरणाचे नाटय़ रचले.
- मंगला बोरसे, आरोपी