फडणवीसांना जपानी विद्यापीठाची हॉनररी डॉक्टरेट
By Admin | Updated: October 5, 2015 16:57 IST2015-10-05T16:57:08+5:302015-10-05T16:57:08+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील ओसाका सिटी विद्यापीठ हॉनररी डॉक्टरेट या पदवीने सन्मान करणार आहे.

फडणवीसांना जपानी विद्यापीठाची हॉनररी डॉक्टरेट
>ऑनलाइन लोकमत
ओसाका (जपान), दि. ५ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील ओसाका सिटी विद्यापीठ हॉनररी डॉक्टरेट या पदवीने सन्मान करणार आहे. हा या विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान असून या पुरस्काराने गौरवण्यात येणारे फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.
ओसामा सिटी विद्यापीठाला १२० वर्षांची परंपरा असून आत्तापर्यंत या विद्यापीठाने जगातील अवघ्या १० व्यक्तिंना हॉनररी डॉक्टरेट पदवीने गौरवलेले आहे. महाराष्ट्रात सामाजिक व आर्थिक विकासासाठी सुधारणांची प्रक्रिया सुरू करण्याचे काम फडणवीसांनी सुरू केल्यामुळे त्यांना गौरवण्यात येत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
विद्यापीठाने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तसेच विद्यापीठामध्ये आपले विचार मांडण्यासाठी आणि विद्यार्थी व जपानी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे.