हेमंत कुलकर्णी अनंतात विलीन

By Admin | Updated: February 4, 2017 01:24 IST2017-02-04T01:24:47+5:302017-02-04T01:24:47+5:30

लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता नाशिक अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Hemant Kulkarni merged in the infinity | हेमंत कुलकर्णी अनंतात विलीन

हेमंत कुलकर्णी अनंतात विलीन

नाशिक : ‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता नाशिक अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ कन्या सौ. मुग्धा शहा यांनी कुलकर्णी यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. अंत्यविधीप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
हेमंत कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. शुक्रवारी सकाळी कॉलेजरोडवरील पाटीललेन नंबर ४ मधील ‘पुष्कराज’ या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. तत्पूर्वी निवासस्थानी लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादक दिनकर रायकर यांच्यासह विविध आवृत्त्यांचे संपादक, कैलास मठाचे संविदानंद सरस्वती यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेत कुलकर्णी कुटुंबीयांचे सांत्वन केले. नाशिक अमरधाम येथेही राजेंद्र दर्डा यांनी कुलकर्णी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. अंत्यविधीप्रसंगी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Hemant Kulkarni merged in the infinity