हेमा उपाध्याय हत्या प्रकरण: पती चिंतनला अटक

By Admin | Updated: December 22, 2015 09:32 IST2015-12-22T09:18:58+5:302015-12-22T09:32:03+5:30

प्रख्यात शिल्पकार हेमा उपाध्याय व वकील हरीश भंबानी यांच्या हत्याप्रकरणी हेमा यांचे पती चिंतन उपाध्याय याला अटक करण्यात आली आहे

Hema Upadhyay murder case: Husband Chintan arrested | हेमा उपाध्याय हत्या प्रकरण: पती चिंतनला अटक

हेमा उपाध्याय हत्या प्रकरण: पती चिंतनला अटक

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - प्रख्यात शिल्पकार हेमा उपाध्याय व वकील हरीश भंबानी यांच्या हत्याप्रकरणी हेमा यांचे पती चिंतन उपाध्याय याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्रभर चिंतनची चौकशी केल्यावर आज सकाळी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असली तरी मारेकरी विद्याधर राजभर अद्यापही फरार आहे.
हेमा आणि वकील हरीश यांच्या हत्येपूर्वी मारेकरी विद्यधर राजभर आणि चिंतन उपाध्यायची चर्चा झाली होती. त्यावरुनच पोलिसांनी याच्य  महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांनी चिंतनला बेड्या ठोकल्या. चिंतनला आज दुपारी बारा वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. 
१२ डिसेंबर रोजी हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश यांचे मृतदेह कांदिवलीच्या एका नाल्यात सापडले होते. हात-पाय बांधलेल्या अवस्थेत प्लास्टिकच्या पिशवीत त्यांचे मृतदेह आढळले होते. 

Web Title: Hema Upadhyay murder case: Husband Chintan arrested