शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

 राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेचा कहर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 08:00 IST

सध्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण कर्नाटकाच्या अंतर्गत भागात उष्णतेची लाट आली आहे़. 

ठळक मुद्देमराठवाड्यातही उष्णतेची लाट : मान्सून दक्षिण अंदमान समुद्रातच

पुणे : दक्षिण अंदमान समुद्रात आलेला मान्सून अद्याप तेथेच स्थिरावला असून त्याच्या पुढील वाटचालीस अनुकुल वातावरण असतानाच राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेचा कहर होऊ लागला आहे़. २४ मे पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४५. ९ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे २०. ८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़. महाबळेश्वर वगळता मध्य महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे कमाल तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे़. मराठवाड्यातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे़. विदर्भातील कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून किमान तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले आहे़.  सध्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण कर्नाटकाच्या अंतर्गत भागात उष्णतेची लाट आली आहे़. २१ ते २४ मे दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ .२१ ते २४ मे दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.  

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानweatherहवामानRainपाऊस