शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

By admin | Updated: June 7, 2015 01:36 IST

तब्बल आठवडाभर अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मॉन्सूनची आगेकूच कायम असून, आसाम मेघालयाचा बहुतांश भाग, नागालंड-मणिपूर

पुणे : तब्बल आठवडाभर अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मॉन्सूनची आगेकूच कायम असून, आसाम मेघालयाचा बहुतांश भाग, नागालंड-मणिपूर, मिझोराम व अरुणाचल प्रदेशाचा संपूर्ण भाग मॉन्सूनने व्यापला आहे. येत्या ४८ तासांत मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, कर्नाटकासह उर्वरित तामिळनाडू, आंध्रप्रदेश किनारपट्टीचा काही भाग आणि मध्य बंगालच्या उपसागरात दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. आता प्रतिक्षा आहे ती मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची! यंदा नियोजित वेळेपूर्वी अंदमानात दाखल झालेला मॉन्सून तब्बल आठवडाभर तिथेच रेंगाळल्यामुळे केरळात त्याचे आगमन होण्यास काहीसा विलंब लागला. सध्या मॉन्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू असून, देशाचा ईशान्य पूर्व भाग मॉन्सूनने व्यापला आहे. याशिवाय कर्नाटक, तामिळनाडू भागातही तो दाखल झाला आहे़ साधारणपणे ५ जूनपर्यंत मॉन्सून कोकणात धडकून महाराष्ट्राच्या सीमा भागात दाखल होतो. पण अजूनही त्याचे आगमन झालेले नाही. त्यामुळे आता सर्व जणच मॉन्सूनकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान काल कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाच्या काही भागात पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे़ पुणे व मुंबईत सायंकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)