शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 05:45 IST

दरड कोसळली, पूल वाहून गेला, दोघेजण बुडाले.

ठळक मुद्देदरड कोसळली, पूल वाहून गेला, दोघेजण बुडाले.

रायगड : जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा सुरूच आहे. मुंबई-पुणे महामार्गावर काजूवाडीजवळ, श्रीवर्धन-नानवली आणि मुरुड-सावली या ठिकाणी दरडी काेसळल्याने वाहतूक ठप्प हाेती, तसेच मुरुड-विहूर परिसरातील पुलाची एक बाजू वाहून गेली आहे. माेहपाडा येथे दाेघांचा बुडून मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर अतिवृष्टीने पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे, तर १४ जुलैपर्यंत पावसाचा तडाखा कायम राहणार असल्याने, प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन-नानवली रस्त्यावर आज दरड कोसळली. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरड हटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

१२ जुलैच्या रात्री मुंबई-पुणे महामार्गावरील काजूवाडी परिसरात दरड कोसळली होती. युद्धपातळीवर काम करून रात्रीच दरड हटविण्यात आली आहे. मुरुड तालुक्यातील सावली टोकेखार या ठिकाणी दरड काेसळल्याने वाहतूक बंद होती. दरड हटविण्याचे काम सुरू आहे. मुरुड तालुक्यातील विहूर येथील पुलाची एक बाजू अतिवृष्टीने वाहून गेली आहे. त्यामुळे दोन्हीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. १२ जुलै रोजी मोहपाडा येथील पलस धरणात बुडून सागर अंबरे (२२) याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दोन तासांनी मिळाला, तसेच मोहपाडा तलावातही राकेशकुमार (१९) हा युवकही १२ जुलै रोजी बुडाला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी तब्बल २४ तासांनी मिळाला. महाड तालुक्यातील म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर रावढळ-तुडील पुलावरून अतिवृष्टीने पाणी जात असल्याने तो वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे, तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

मुंबईत पावसाची जोर‘धार’; ऑरेंज अलर्ट कायममुंबई : मुंबईसह कोकणाला हवामान खात्याने दिलेला ऑरेंज अलर्ट कायम असून, १४ जुलै रोजी कोकणात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. शिवाय किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. सोमवारी कोसळलेल्या पावसानंतर मंगळवारी सकाळीदेखील मुंबईत पावसाचा मारा कायम होता. 

सौराष्ट्र किनारीपट्टी ते पश्चिम - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत (दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओरिसा) कमी दाबाचा पट्टा असून, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत तीन ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. ११ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. २२ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. सकाळी कोसळलेल्या पावसाने दुपारी मात्र विश्रांती घेतली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली होती.

१४ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातदेखील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १५ जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

११ कामगार किरकोळ जखमीसोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मार्वे मालाड येथील आयएनएस हमला, नेव्ही मेन गेट येथे तात्पुरत्या सेटचा भाग कोसळला. या दुर्घटनेत ११ कामगार किरकोळ जखमी झाले. त्यापैकी दहा जणांना आयएनएस हमला येथे उपचार करून सोडण्यात आले. एका जखमी कामगाराची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगडMumbaiमुंबईweatherहवामान