पुणे : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेल्या २४ तासात कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गुहागर १५०, कुडाळ १२०, रत्नागिरी ११०, मुंबई (कुलाबा) १००, चिपळूण, दोडामार्ग, मालवण ८०, म्हापसा, मुरुड ७०, उरण, वाल्पोई ६०, हर्णे, राजापूर, सावंतवाडी, वेंगुर्ला ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय बºयाच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात विटा ११०, दौंड, मालेगाव, बागलाण ७०, गगनबावडा, त्र्यंबकेश्वर ६०, करमाळा, खेड, राजगुरुनगर, ओझर, पुणे, शाहूवाडी ५०, कळवण, तळोदा ४० मिमी पावसाची नोंंद झाली होती. मराठवाड्यात अंबड १०, आष्टी, केज, वाशी ६०, अंबेजोगाई, भूम, घनसावगी, हिंगोली, लोहा, परतूर ४०, औरंगाबाद, औसा, जाफराबाद, पैठण, सेनगाव, सोयेगाव ३० मिमी पाऊस पडला़ विदर्भात नांदगाव, काजी ५०, देऊळगाव राजा, लाखंदूर, मनोरा, वरोरा ४०, बुलढाणा, चिखली, देसाईगंज, सिंधखेड राजा ३० मिमी पाऊस झाला.घाटमाथ्यावर धारावी ९०, ताम्हिणी ७०, डुंगरवाडी, दावडी, भिरा ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.मंगळवार दिवसभरात महाबळेश्वर येथे ३५, कोल्हापूर ६, पणजी ६ मिमी पाऊस झाला आहे.१ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.............कोकणातील रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २, ३ व ४ जुलै रोजी जोरदार ते अतिजोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ३ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबईत २ ते ४ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात ३ व ४ जुलै रोजी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता, कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 00:39 IST
पालघर, ठाणे, मुंबईत २ ते ४ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता
राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता, कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
ठळक मुद्देपालघर, ठाणे, मुंबईत २ ते ४ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता