शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 20:20 IST

कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा..

ठळक मुद्देकोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता

पुणे : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ येत्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सर्वदूर ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. मॉन्सून सध्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा, तामिळनाडु, कर्नाटक, केरळ, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी सक्रिय आहे़. कोकणात सुधागड पाली ९०, डहाणु ५०, पेण, संगमेश्वर, देवरुख ४०, जव्हार, खेड, माणगाव, मुरुड, पोलादपूर, वैंगुर्ला ३० मिमी पाऊस पडला़ मध्य महाराष्ट्रात संगमेश्वर २८०, पुरंदर सासवड १४०, रहाता १००, दिंडोरी, शिरपूर, श्रीरामपूर, सुरगाणा ७०, मुक्ताईनगर, वेल्हे ६०, बोदवड, पेठ, पुणे, येवला ५०, दहीगाव, जामनरे, जावळी मेधा, ओझर, पाटण, पौड, सांगोला, सिंदखेडा, सिन्नर, सोलापूर ४० मिमी पावसाची नोंद झाली होती़ त्याशिवाय बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडला़. मराठवाड्यातील बिलोली ५०, कळंब ४०, औरंगाबाद, बदनापूर, भोकरदन, मुदखेड, परांदा, सेनगाव, सिल्लोड, वडवणी ३०, घनसावंगी, कन्नड, खुलताबाद, परळी वैजनाथ, फुलंब्री, पूर्णा, रेणापूर २० मिमी पाऊस झाला़. विदर्भात आमगाव, अमरावती, भिवापूर, मंगळुरपीर, नागपूर ५०, बुलढाणा, खामगाव, रिसोड, संग्रामपूर ४० मिमी पाऊस झाला याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़. येत्या २४ तासात कोकण, गोव्यत बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ .़़़़़़़़़़़पालघर येथे शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. कोकणातील अन्य जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ .

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानfloodपूर