शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात अतिमुसळधार पाऊस बरसणार, राज्यात कुठे कशी असणार स्थिती?; ताजा हवामान अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 17:39 IST

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Forecast ( Marathi News ) : राजधानी मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच हवामान खात्याकडून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसंच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.

प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत कसं असेल वातावरण?

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेसह सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहील, तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१ डिग्री सेल्सिअस आणि २६ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल.

पुण्याबाबत काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

पुणे जिल्ह्यांत पुढील पाच दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ३१ जुलै रोजी ५२ मिमी, १ ऑगस्ट रोजी ४९ मिमी, २ ऑगस्ट रोजी ८० मिमी, ३ ऑगस्ट रोजी ९५ मिमी आणि ४ ऑगस्ट रोजी १०० मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस भात उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याचा ठरणार आहे.

टॅग्स :weatherहवामानMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटRainपाऊस