शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, अनेक नद्यांना आला पूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 09:15 IST

कोल्हापूर जिल्ह्यात रात्रभर धुवादार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर, मांडूकली गावाजवळ रस्त्यावर १.५ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे

मुबई - मागील काही तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील काही नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूरातील कुंभी नदीवरील गोठे परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यात रात्रभर धुवादार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर, मांडूकली गावाजवळ रस्त्यावर १.५ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. कळे मार्गे येवून गगनबावडा जाणारी वाहतूक, तसेच कोल्हापूर कडून जाणारी वाहतूक थांबविली आहे. वैभववाडी कडून येणारी वाहतूक गगनबावडा येथे थांबविण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत

तर गडचिरोलीतही मुसळधार पावसामुळे पर्लाकोटा नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे. भामरागड तालुक्यातील दूरध्वनीसेवा व वीजपुरवठा ठप्प आहे. पेरमिलीजवळच्या नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पेरमिली-भामरागड मार्ग बंद आहे.

कोकण, गोव्यासह पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसत असून त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत असून काही धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. ठाणे, बदलापूर, नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने बदलापूरजवळ असलेले बारवी धरण 100 टक्के भरुन वाहू लागले आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सकाळपासूनच विसर्ग सुरू झाला आहे.

तर मुंबई शहरातही रात्रीपासून मुसळधार पावसाने जोर कायम ठेवला आहे. अंधेरी, दादर, कांदिवली, बोरिवली, मुलुंड, वरळी, चर्चगेट भागात जोरदार पाऊस पडत आहे. पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भामध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. कोकण व गोव्यावर मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय, गुजरात आणि मध्य महाराष्ट्र मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा इशारा स्कायमेटने दिला आहे. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिकGadchiroliगडचिरोली