शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जोर'धार' पाऊस ! रायगडमधील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 20:21 IST

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी किनारवरील 19 गावांना तर अंबा नदी किनारच्या 9  गावांना पूर आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे.

जयंत धुळप/रायगड, दि. 29 - गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी किनारवरील 19 गावांना तर अंबा नदी किनारच्या 9  गावांना पूर आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गावांमध्ये संबधीत धोक्याचा इशारा देऊन ग्रामस्थांना सतर्क करण्यात आले आहे. शिवाय, आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

सावित्री नदी किनारवरील 43 गावांमध्येही सतर्कतेचा इशारादरम्यान महाबळेश्वर येथे सोमवारी (28 ऑगस्ट) रात्री झालेला पाऊस आणि पोलादपूर व महाड तालुक्यांत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे यामुळे सावित्री नदीच्या जलपातळीतदेखील झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी सावित्री नदी किनारच्या 43 गावांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाटबंधारे विभागाचा जिल्हा प्रशासनास तातडीचा संदेशकुंडलिका नदीची धोक्याची पातळी २३.९५ मीटर आहे व सद्यस्थितीत जलपातळी डोलवहाळ येथे २३.४० मीटर झाली तर अंबा नदीची धोक्याची जलपातळी नागोठणे येथे ९ मीटर आहे तर सद्यस्थितीत ही पातळी ८.२० मीटर झाली आहे. कोणत्याही क्षणी या दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी किनारच्या गावांमध्ये घुसू शकत असल्याने,  किनारवरील गावे, वस्त्या व वाड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी आपत्ती निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, असा संदेश रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयातील पूर नियंत्रण अधिकाऱ्यांनी मंगळवारी पहाटे रायगड जिल्हा प्रशासनास पाठवून कळवले आहे.

समुद्र भरतीमुळे नदी जलपातळी खाली येण्यास किमान 4 तास लागणारसकाळी 11 वाजता समुद्राला पूर्ण भरती असल्याने तसेच पाऊस सतत सुरु असल्याने नद्यांचे पाणी समुद्रात पोहोचून पूर पातळी खाली येण्यास किमान चार तास लागणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

पेणमध्ये 24 तासांत २६० मिमी विक्रमी पाऊसजिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असून 24 तासांत जिल्ह्यात सर्वाधिक आणि विक्रमी अशा २६० मिमी पावसाची नोंद पेण येथे तर २१३ मिमी पावसाची नोंद म्हसळा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी अलिबाग येथे १५५, मुरुड-१२७, पनवेल-१२४, उरण-१७१,  माणगांव-१०७, तळा-१५५, महाड-११३.५०, पोलादपूर-१२३, श्रीवर्धन-१००,माथेरान-१३८ ,कर्जत-७५.८०, खालापूर-७८,  रोहा-१४२, पाली-सुधागड-८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचे  सरासरी पर्जन्यमान या 24 तासात १३५.४२ मिमी होते.

भिरा धरण क्षेत्रात 183 मिमी पाऊसरायगड जिल्ह्यातील भिरा धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 183 मिमी पावसाची नोंद झाली असून, धरणातील जलपातळी नियंत्रणात राखण्याकरीता धरणाच्या तीन दरवाजांपैकी क्र.1 व 3 असे दोन दरवाजे 0.25 सेमी उघडण्यात आले आहेत. परिणामी आता पर्यंत 62.400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. भिरा धरण क्षेत्रांत 1 जून 2017 पासून एकूण 4454.20 मिमी पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी धरणातील जलपातळी 95.12 झाली आहे.  

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार