मुंबईत सव्वातासांत आणले हृदय
By Admin | Updated: July 29, 2016 01:21 IST2016-07-29T01:21:37+5:302016-07-29T01:21:37+5:30
मुंबईत गुरुवारी २४ वे यशस्वी हृदयप्रत्यारोपण यशस्वी झाले आहे. सुरतहून १ तास २२ मिनिटांचा प्रवास करत हे हृदय मुलुंडच्या खाजगी रुग्णालयात आणण्यात आले.

मुंबईत सव्वातासांत आणले हृदय
मुंबई : मुंबईत गुरुवारी २४ वे यशस्वी हृदयप्रत्यारोपण यशस्वी झाले आहे. सुरतहून १ तास २२ मिनिटांचा प्रवास करत हे हृदय मुलुंडच्या खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. सुरतच्या ३४ वर्षीय दात्याने साताऱ्याच्या २९ वर्षीय गृहिणीला जीवनदान दिले आहे.
साताऱ्यात राहणारी २९ वर्षीय गृहिणी ‘डायलेटेट कार्डिओमायोपॅथी’ या आजाराने त्रस्त होती. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यासाठी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणे आवश्यक होते. गेली ५ आठवडे त्या हृदयाच्या प्रतीक्षेत होत्या. त्यातच सुरत येथील एका खाजगी रुग्णालयात एका ३४ वर्षीय पुरुषाचा ब्रेनडेडने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी हृदय, मूत्रपिंड आणि यकृत दानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानंतर बुधवारी मध्यरात्री २च्या सुमारास या तरुणाचे हृदय सुरत विमानतळावर पोहोचले. डॉ. अन्वय मुळे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. (प्रतिनिधी)