शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: सत्तासंघर्षावर आज सुनावणी; सरन्यायाधीशांकडून पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 06:37 IST

घटनापीठ स्थापन करताना सरन्यायाधीश उदय लळित यांनी त्यात स्वतःचा समावेश केलेला नाही.

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील बहुप्रतीक्षित सुनावणी उद्या, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे होणार आहे. सरन्यायाधीशांनी पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन केले आहे. न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. नरसिंहा यांचा घटनापीठात समावेश आहे. घटनापीठ स्थापन करताना सरन्यायाधीश उदय लळित यांनी त्यात स्वतःचा समावेश केलेला नाही. एकनाथ शिंदे सरकारची घटनात्मक वैधता, उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या १६ सदस्यांवर बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले निमंत्रण व विधानसभा अध्यक्षांनी निवडीला दिलेले आव्हान, हे सर्व मुद्दे घटनात्मक तरतुदींशी संबंधित असल्याने यावर सखोल सुनावणीची गरज आहे. यासाठी सर्व याचिकांवर घटनापीठापुढे सुनावणी होईल, असेही स्पष्ट केले होते. 

निवडणुका असल्याने चिन्हाबाबत स्पष्टता हवी -- शिंदे गटाकडून मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात वकील नीरज किशन कौल यांनी अर्ज दाखल करून या याचिकांवर त्वरित सुनावणी करण्याची विनंती केली. - निवडणूक आयोगापुढे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत असलेल्या वादाचा निपटारा करता येईल, असा युक्तिवाद कौल यांनी यावेळी केला. यामुळे ‘खरी’ शिवसेना कुणाची आहे, याचा निवाडा करणे सोईचे होईल, असेही कौल यांनी सांगितले. - येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने निवडणूक चिन्हाच्या मुद्याबाबत स्पष्टता येण्याची आवश्यकता असल्याचे नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, उद्धव ठाकरेंची भूमिका -- शिंदे गटाच्या अर्जावर सरन्यायाधीश उदय लळीत म्हणाले, ‘मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही; परंतु उद्या नक्की काहीतरी होईल.’ यानंतर न्या. रवींद्र भट यांच्याशी सरन्यायाधीशांनी चर्चा केली. - यावेळी उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, असे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली.- कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. याआधी झालेल्या सुनावणीत कोर्टाने आयोगाला यावर निर्णय घेऊ नका, अशा सूचना दिल्या होत्या.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना