शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 07:28 IST

Maratha Reservation: मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १८ जुलैपासून पुन्हा सुनावणी घेण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने बुधावारी स्पष्ट केले.

मुंबई - मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १८ जुलैपासून पुन्हा सुनावणी घेण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने बुधावारी स्पष्ट केले. या कायद्याचा लाभ घेऊन शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारे आणि सरकारी नोकरी मिळविणाऱ्यांचे भवितव्य या याचिकांच्या अंतिम निकालाशी अधीन राहील, असेही न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण कायदा, २०२४’च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवर सुनावणीसाठी न्या. रवींद्र घुगे, न्या. एन. जे. जमादार व न्या. संदीप मारणे यांच्या विशेष पूर्णपीठाची गेल्याच महिन्यात स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे या याचिकांवर सुनावणी झाली.  मात्र, न्या. उपाध्याय यांची बदली करण्यात  आल्याने या याचिकांवरील सुनावणी थांबली होती. 

नीट विद्यार्थ्यांच्या याचिकेवर उत्तर द्यान्यायालयाने या याचिकांवरील पुढील सुनावणी १८ जुलै रोजी ठेवली. तसेच नीटच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १० जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देशही सरकारला दिले.

यापूर्वी असे घडले होते...१४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला विशेष पूर्णपीठाची स्थापना करून जलदगतीने सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. गेल्यावर्षी, मार्चमध्ये कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या, कायद्याला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, तेव्हा न्यायालाने स्पष्ट केले होते की, या कायद्याचा लाभ घेऊन शैक्षणिक संस्थांत प्रवेश घेणाऱ्या व सरकारी नोकरी मिळविणाऱ्यांचे भवितव्य या अंतिम निकालाच्या अधीन राहील. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtraमहाराष्ट्र