शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
3
शौचालयात गेलला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
4
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
5
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
6
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
7
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
8
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
9
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
10
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
11
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
12
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
13
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
14
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
15
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
16
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
17
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
18
बॉलिवूड अभिनेत्याला SBI कडून मिळतात दरमहा १८ लाख ९० हजार रुपये, काय केलाय जुगाड?
19
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
20
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!

नीरव मोदी बँक गैरव्यवहारप्रकरणाची सुनावणी २९ जूनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 18:48 IST

नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिका-यांशी संगनमत करून बँकेला तब्बल ११,४०० कोटी रुपयांचा गंडा घातला होता.

ठळक मुद्देपंजाब बँकेला घातला कोटींचा गंडा, मोदी व कुटुंबीय परदेशात फरार मुंबईतील न्यायाधिकरणातील न्यायाधीशांची जागा रिक्त असल्याने कार्यभार पुण्याकडेया प्रकरणी मुंबई 'डीआरटी-वन'मध्ये वसुली दावा (रिकव्हरी सूट) दाखल

पुणे : नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिका-यांशी संगनमत करून बँकेला तब्बल ११,४०० कोटी रुपयांचा गंडा घातला होता. त्यानंतर मोदी व कुटुंबीय परदेशात फरार झाले आहेत. या फसवणुकीच्या विरोधात पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती.  दाखल करण्यात आलेल्या दाव्याची पुढील सुनावणी 29 जुन रोजी होणार आहे. बँकेने या प्रकरणी मुंबई 'डीआरटी-वन'मध्ये वसुली दावा (रिकव्हरी सूट) दाखल केला आहे. मात्र, मुंबईतील या न्यायाधिकरणातील न्यायाधीशांची जागा सध्या रिक्त  असल्याने औरंगाबाद येथील 'डीआरटी'चाही अतिरिक्त कार्यभार सध्या पुण्यातील पुणे डीआरटी वन या न्यायाधीकरणाकडे सोपविण्यात आला आहे.  पंजाब नॅशनल बँकेतर्फे या प्रकरणाची सुनावणी पुण्यात घेण्याची विनंती करण्यात आली होती. या कारणास्तव पंजाब नॅशनल बँक विरूद्ध नीरव मोदी प्रकरणाची सुनावणी बुधवारी, १२ जून रोजी पुण्यातील 'डीआरटी'मध्ये पार पडली. या सुनावणीदरम्यान पंजाब नॅशनल बँकेच्या वकिलांनी आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. मोदी यांच्या वतीने कोणीही न्यायालयासमोर हजर नव्हते. त्यामुळे बँकेच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल २९ जून रोजी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

* पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी विरोधात तीन दावे दाखल केले असून त्यांपैकी पहिला दावा सात हजार कोटी रुपयांचा आहे. दुसरा दावा तीनशे कोटी रुपयांचा आहे, तर तिसरा दावा हा १७०० कोटी रुपयांचा आहे. बुधवारी पहिल्या व दुस-या म्हणजेच एकूण ७३०० कोटी रुपयांच्या दाव्यांबाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला. १७०० कोटी रुपयांच्या तिस-या दाव्याची सुनावणी पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे २९ तारखेला पहिल्या दोन दाव्यांबाबत कर्जवसुली न्यायाधिकरणाचे न्यायाधीश काय निकाल देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेNirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय