आजपासून सर्वोच्च न्यायालयातमराठा आरक्षणावर सुनावणी पार पडणार होती. परंतु आता ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयासमोर ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं न घेता प्रत्यक्षरित्या घेण्याची विनंती केली. दरम्यान, दोन आठवड्यांनी म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी न्यायालय आता यावर निर्णय देणार असल्याची माहिती समोर आली आहे.मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी पार पडणार होती. यापूर्वी २५ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मराठा आरक्षणावरील सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे करण्यात येणार होती. परंतु आता ही सुनावणी तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार
By जयदीप दाभोळकर | Updated: January 20, 2021 11:06 IST
सुनावणी प्रत्यक्षरित्या घेण्याची राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली विनंती
मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार
ठळक मुद्देसुनावणी प्रत्यक्षरित्या घेण्याची राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली मागणीआजपासून पार पडणार होती सुनावणी