शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींच्या फाशीवर १८ जुलैपासून सुनावणी

By admin | Updated: June 17, 2014 03:36 IST

न्या़ विजया कापसे-ताहिलरमानी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने वरील तारखेपर्यंत ही सुनावणी तहकूब केली़

मुंबई : महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये एका छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर १८ जुलैला सुनावणी होणार आहे़न्या़ विजया कापसे-ताहिलरमानी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने वरील तारखेपर्यंत ही सुनावणी तहकूब केली़ अद्याप आरोपींनी या शिक्षेविरोधात अपील याचिका दाखल केलेली नाही़गेल्या वर्षी आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली व सलीम अन्सारी या आरोपींनी छायाचित्रकार तरुणीवर या मिलमध्ये सामूहिक बलात्कार केला़ याआधी याच आरोपींनी एका टेलिफोन आॅपरेटर तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता़ यासाठी दोषी धरत सत्र न्यायालयाने या तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ त्यानंतर सरकारी पक्षाने छायाचित्रकार तरुणीवरील बलात्कारप्रकरणी या आरोपींवर फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेल्या ३७६ (इ) या नवीन कलमाअंतर्गत आरोप निश्चित केला़ त्यानुसार या आरोपींविरोधात स्वतंत्र साक्षीदार तपासले गेले़ त्याअंतर्गत या आरोपींचा नवीन कलमाअंतर्गत गुन्हा सिद्ध झाला व सत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. (प्रतिनिधी)